-
करोना माहामारीमुळे संपुर्ण जग त्रस्त आहे. जगातील सर्वात शक्तिशाली देश देखील यातून सुटू शकला नाही. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगात लसीकरणाला वेग आला आहे. अनेक देशात लसीकरणासाठी वेगवेगळे अभियान राबवले जात आहेत. लस घेण्यासाठी जागरूक केले जात आहे. अमेरिकेतही लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या जात आहेत. (photo AP)
द न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या वॉशिंग्टन भागात लसीकरणासाठी एक अनोखी मोहीम राबविली जात आहे. लोकांना लसऐवजी गांजा'ची अनोखी ऑफर देण्यात येत आहे. जो लस घेईल त्याला मोफत गांजा देण्यात येईल, असे सांगितले जात आहे. अमेरिकेत गेल्या काही दिवसांमध्ये लसीकरणाची गती मंद झाली आहे. त्यामुळे लोकांना लस घेण्यास प्रोत्साहित केले जात आहे. (photo AP) -
वॉशिंग्टन भागात २०१२ पासून गांजाचा वापर आणि विक्रीवर बंदी आहे. म्हणून अशी मोहीम येथे चालविली जात आहे. लसीकरणासाठी आलेल्या २१ वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोणत्याही केंद्रावर लशीसोबत गांजाचा फ्री जॉईंट दिला जात आहे. . (photo AP)
-
तसेच वॉशिंग्टन भागातील बार आणि इतर मद्य परवानाधारकांना सहा आठवड्यांच्या आत लसीकरण केलेल्या प्रौढ नागरिकांना विनामूल्य बिअर आणि वाइन देण्याची परवानगी देण्यात आली आहे. कॅलिफोर्निया आणि ओहियो सारख्या अनेक भागात 'लॉटरी' सुरू केल्या आहेत. यामध्ये लसीकरण करणार्यांची निवड केली जाते आणि नंतर त्यांना रोख बक्षिसे किंवा महाविद्यालयीन शिष्यवृत्ती दिली जाते. (photo AP)
-
अमेरिकेत काही भागात लसीकरणावर विमानाचे तिकिट, विनामूल्य बिअर देण्यात येत आहे. या मोहिमेचा परिणाम राज्यातही दिसून येत आहे. त्यामुळे लोक घराबाहेर पडून लस केंद्रांवर पोहोचत आहेत. गांजा मोफत वाटण्याची सुरवात पहिल्यांदा एरिजोना राज्याने केली. (photo AP)
वॉशिंग्टनमध्ये 'लसीच्या बदल्यात गांजा' देण्याची मोहीम १२ जुलैपर्यंत चालणार आहे. (photo AP) -
अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन ४ जुलै रोजी साजरा केला जातो. अशा परिस्थितीत अध्यक्ष जो बायडेन यांनी जाहीर केले की, या दिवसापर्यंत देशात ७० टक्के लोकांना लसीचा पहिला डोस दिलेला असेल. (photo AP)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल