-
काँग्रेसचे खासदार शशी थरूर हे त्यांच्या इंग्रजीसाठी ओळखले जातात. जगभरातील फॉलोअर्सच्या ज्ञानामध्ये थरूर ट्विटरवरुन भर टाकत असतात.
-
अनेकदा थरूर ट्विटरवरुन व्यक्त होताना असे काही इंग्रजी शब्द वापरतात की जे अनेकांनी पूर्वी ऐकलेले किंवा पाहिलेले नसतात.
-
अनेकदा थरुर यांचं इंग्रजी हे मिम्सचा विषय ठरतं. म्हणजे मध्यंतरी थरुर यांनी ‘floccinaucinihilipilification’ हा इंग्रजी शब्द एका ट्विटमध्ये वापरला होता. थांबा देवनागरीमध्ये सांगायचं झालं तर हा शब्द आहे ‘फ्लॉकीनॉकिनीहिलिपिलिफिकेशन’. लागला की नाही दम? तर या शब्दाचा अर्थ आहे, व्यर्थ गोष्टींबाबत विचार करण्याची सवय.
-
आता हे असे शब्द थरुर वापरु लागल्याने नेटकरीही फार वेळ व्यर्थ न घालवता मिम्सचा पाऊस पडताना दिसतात. असेच काही मिम्स आपण या गॅलरीमधून पाहणार आहोत.
-
नेटकऱ्यांच्या भाषेत सांगायचं तर थरुर यांच्या ज्या हायफंडू इंग्रजीमुळे बोबडी वळते अशा ट्विटवर सर्वसामान्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि मिम्स आपण पाहूयात…
-
त्यांचं इंग्रजी वाचल्यावर अशीच परिस्थिती होते अनेकांची
-
हिला थरुर यांनीच पत्र पाठवलं असणारं.
-
थरुर यांचं इंग्रजी वाचून आपण सारे…
-
इतरांचं आणि थरुर यांचं इंग्रजी
-
हे इंग्रजी तर इंग्रजीच्याही पल्याड आहे.
-
जेव्हा त्यांनी ट्विट केलेला शब्द तुम्हाला उच्चारता येतो
-
थरुर यांचा दिनक्रम असा असतो म्हणे…
-
एकाने तर जगप्रसिद्ध डिक्शनरीचे लेखक थरुर यांचे पालक असल्याचंही म्हटलंय.
-
एवढं इंग्रजी तर आम्ही वर्षभरात बोलतो
-
शिकवतात काय आणि विचारतात काय
-
थरुर पाणीपुरी कशी मागत असतील असा विचारही एकाने केलाय.
-
थरुर शिक्षाही इंग्रजीतच देत असतील?
-
जन्म कसा झाला हा प्रश्न विचारला तर थरुर असं काहीतरी म्हणतील असा एकाने बांधलेला अंदाज
-
एवढं इंग्रजी आम्ही वर्षभरात वाचलं नाही कधी
-
सर्वसामान्यच काय बडेबडे राजकारणीही थरुर यांच्या इंग्रजीमुळे गोंधळतील असं या मिममधून सांगण्यात आलंय. "अमित शाहसुद्धा थरुर English पाहून गोंधळतील", असं यातून म्हटलंय.
-
बरं हे मोजके ट्विट आणि मिम्स असले तरी थरुर जेव्हा जेव्हा नवा शब्द ट्विट करतात गुगलमध्ये त्यांच्यासंदर्भातील सर्च वाढतो इतकं त्याचं आणि त्यांच्या इंग्रजीचं फॅन फॉलोइंग आहे असं म्हणता येईल.

डोक्यातील निगेटिव्ह विचारांमुळे रात्री झोपच लागत नाही? फक्त ५ उपाय; शांत लागेल झोप