-
जगामध्ये विचित्र गोष्टींची काही कमतरता नाही. विशेष म्हणजे याच विचित्रपणासाठी या गोष्टींचं मूल्य सुद्धा फार असतं. अशाच एका विचित्र घराची सध्या इंटरनेटवर आहे. कारण आहे या घराचं लोकेशन. (सर्व फोटो : Instagram/kudproperties वरुन साभार)
-
आता तुम्हीच विचार करा एखाद्या वाळवंटामध्ये कोणी आलिशान घर का बांधेल? पण असं एक आलिशान घर बांधलं असून सध्या त्याचं काम सुरु असलं तरी पूर्ण बांधून होण्याआधीच ते विक्रिसाठी काढलंय आणि त्याची किंमत पाहून अनेकजण थक्क झालेत.
-
या घराच्या आजूबाजूला वाळवंट सोडलं तर काहीच नाहीय. म्हणजे वर तळपणारा सूर्य आणि पायाखाली तापलेली वाळू एवढ्या गोष्टी या घराच्या बाहेर आहेत.
-
अमेरिकेतील कॅलिफॉर्नियामधील मोजाव्हे वाळवंटामध्ये हे घर बांधण्यात आलं असल्याचं द मेट्रोने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. हे घर पाच एकराच्या जमीनीच्या तुकड्यावर बांधण्यात आलेलं आहे.
-
हे घर पूर्णपणे काँक्रिटने बनवण्यात आलेलं आहे. अर्बन आर्किटेक्चरल स्पेस ग्रुप नावाच्या कंपनीने हे घर बांधलं असून त्याला कुद डेव्हलपर्सने प्रत्यक्षात साकारलं आहे.
-
एका रेतीच्या डोंगराजवळ उभारण्यात आलेलं हे घर बांधताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मुळात घरासाठी जमीन सपाट करायलाच फार मेहनत घ्यावी लागली.
-
हे घर पूर्णपणे बांधून तयार झालेलं नसलं तरी ते घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी घराला भेट देण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलीय.
-
अल् सिमेन्टो उनो असं या घराचं नाव असून त्याचा एरिया हा एक हजार ६४७ स्वेअर फूट इतका आहे. घरामध्ये दोन मोठे बेडरुम आणि दोन मोठे तसेच एक छोटं बाथरुम आहे.
-
हे घर २०२२ पर्यंत पूर्णपणे बांधून तयार होणार आहे. हे घर अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त आहे.
-
हे घर रात्रीही फार सुंदर दिसतं. अरे हो एक गोष्ट सांगायची राहिलीच ती म्हणजे याची किंमत. वाळवंटातील या घराची किंमत १.७५ मिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार हे घर १२ कोटी ८० लाखांना आहे.

सरन्यायाधीश भूषण गवई यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची तातडीने भेट; मोठी घडामोड घडणार?