-
मुंबई : ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालया’मध्ये तब्बल पंधरा वर्षांनी वाघाच्या बछड्यांचा जन्म झाला असून नवजात मादी पिल्लाचे नामकरण ‘वीरा’ असे करण्यात आले आहे. (फोटो : The Mumbai Zoo / फेसबुक)
-
पाच महिन्यांपूर्वी जन्मलेल्या पेंग्विनच्या पिल्लाचे नाव ‘ऑस्कर’ असे ठेवण्यात आले आहे. (फोटो : The Mumbai Zoo / फेसबुक)
महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी हा ‘बारसे सोहळा’ पार पडला. (फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस) -
जिजामाता उद्यानात कित्येक वर्षे वाघ नव्हते. (फोटो : निर्मल हरिंद्रन, इंडियन एक्सप्रेस)
औरंगाबादच्या ‘सिद्धार्थ गार्डन प्राणिसंग्रहालया’तून १२ डिसेंबर २०२० रोजी वाघाची जोडी राणीच्या बागेत आणण्यात आली होती. (फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस) त्यापैकी वाघाचे नाव शक्ती, तर वाघिणीचे करिश्मा असे ठेवण्यात आले होते. (फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस) -
या जोडीने गेल्या वर्षी १४ नोव्हेंबर रोजी एका मादी बछड्याला जन्म दिला. (फोटो : The Mumbai Zoo / फेसबुक)
-
या बछड्याचे नामकरण मंगळवारी ‘वीरा’ असे करण्यात आले. (फोटो : The Mumbai Zoo / फेसबुक)
-
करिश्मा वाघीण ही सध्या आपल्या बछड्याच्या संगोपनात गुंतली आहे. (फोटो : The Mumbai Zoo / फेसबुक)
-
वीराला पशुवैद्यकांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून लवकरच लसीकरण केले जाणार आहे. (फोटो : The Mumbai Zoo / फेसबुक)
-
प्राणिसंग्रहालयातील आकर्षण केंद्र असलेल्या पेंग्विन कक्षातील मोल्ट-फ्लिपर या जोडीने १८ ऑगस्ट २०२१ रोजी एका नर पिल्लाला जन्म दिला. (फोटो : The Mumbai Zoo / फेसबुक)
त्याचे नामकरणही मंगळवारी पार पडले. (फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस) पिल्लाला ‘ऑस्कर’ हे नाव देण्यात आले आहे. (फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस) नामकरणाचा कार्यक्रम अगदी समारंभपूर्वक आणि प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत पार पडला. (फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस) प्राणिसंग्रहालयातील पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी सुचवलेल्या नावांमधून ही दोन नावे निवडण्यात आली आहेत. (फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)

नरेंद्र मोदी पंतप्रधान का बनले? सरन्यायाधीश भूषण गवईंनी थेट लंडनमधून सांगितले…