-
प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचा मुलगा जय अनमोल अंबानीचा २० फेब्रुवारी रोजी विवाह सोहळा पार पडला.
-
अनमोलने क्रिशा शाहसोबत लग्नगाठ बांधली.
-
या लग्नात बॉलिवूड चित्रपटसृष्टीपासून राजकीय क्षेत्रातील अनेक मोठ्या लोकांनी हजेरी लावली.
-
टीना अंबानी यांनी लग्नचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
अनमोलने लग्नात राखाडी रंगाची शेरवानी परिधान केली होती.
-
अनिल अंबानी यांच्या मुंबईतील पाली हिल इथल्या परिसरातील आलिशान घरात हा लग्नसोहळा पार पडला.
-
लाल रंगाच्या भरजरी लेहेंग्यात क्रिशा खूपच सुंदर दिसत होती.
-
लग्नाचे ठिकाण अतिशय सुंदर पद्धतीने सजवण्यात आले होते.
-
या लग्नात ईशा अंबानीने बेबी पिंक कलरचा लेहेंगा परिधान केला होता.
-
राजेशाही पद्धतीने अनमोल आणि क्रिशाचा विवाहसोहळा पार पडला.
-
देशभरातून अनमोल आणि क्रिशावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
मुंबईत राहणारी क्रिशा ही सामाजिक कार्यकर्ती आणि एक उद्योजिका आहे.
-
Dysco या सोशल नेटवर्किंग कंपनीची क्रिशा संस्थापक आहे.
-
क्रिशा ही युकेमधील अक्सेंचर या कंपनीत काम करत होती. मात्र भारतात परतल्यानंतर तिने स्वत:ची कंपनी स्थापन केली.
-
क्रिशाने कॅलिफोर्निया विद्यापिठातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं.
-
लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून क्रिशाने पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे.
-
या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : टीना अंबानी / इन्स्टाग्राम)

WTC Points Table: सामना ड्रॉ होताच दोन्ही संघांना मोठा धक्का! सामन्यानंतर नेमकं काय घडलं?