-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या मनसेच्या मेळाव्यामध्ये मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात भूमिका घेताना भोंगे उतरवले नाही तर मशिदींसमोर भोंग्यांवर हनुमान चालीसा लावू अशी भूमिका घेतलेली. या भूमिकेनंतर पुण्यातील मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आपण मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवणार नाही असं सांगत राज ठाकरेंच्या भूमिकेविरोधात वक्तव्य केलेलं. (फाइल फोटो)
-
त्यानंतर मागील काही दिवसांपासून मोरे हे पक्षावर नाराज असल्याची, ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा पुण्यातील राजकीय वर्तुळात होती. मात्र याच चर्चांना उधाण आलेले असताना आज वसंत मोरेंनी मुंबईमध्ये राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन पक्षप्रमुख राज यांनी भेट घेतली.
-
वसंत मोरे नाराज असल्याची चर्चा असतानाच ही भेट झाली असून आपण या भेटीने समाधानी असल्याचं वसंत मोरे म्हणाले आहेत. दरम्यान या भेटीत काय काय घडलं याची झलक दाखवणारे काही फोटो समोर आलेत. (फाइल फोटो)
-
हा फोटो वसंत मोरे यांनीच पोस्ट केलाय. या फोटोमध्ये राज यांच्या उजव्या बाजूला वसंत मोरे आहेत तर डाव्या बाजूला पुण्याचे मनसे शहरप्रमुख साईनाथ बाबर दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना वसंत मोरेंनी ‘जय श्रीराम’ असं म्हटलंय. तसेच कॅप्शनमध्ये वसंत मोरेंनी, “मी माझ्या साहेबांसोबत… आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही…!” असं म्हटलंय.
-
भेटीदरम्यानचा आजचा हा आणखी एक फोटो. एकीकडे १०० टक्के समाधानी म्हणतानाच दुसरीकडे फोटोला वनवासाचा संदर्भ देत केलेलं भाष्य हे विरोधाभास दर्शवणारं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलीय.
-
या भेटीमध्ये वसंत मोरेंसोबतच साईनाथ बाबर ही उपस्थित होते. दोन्ही नगरसेवक बैठक संपल्यानंतर निघण्याआधी राज ठाकरेंच्या पाया पडल्याचं फोटोंमध्ये दिसत आहे.
-
वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांच्याशिवाय पुणे मनसेचे पदाधिकारीही या सभेला हजर होते.
-
सात मार्च रोजी बाबर यांच्याकडे पुणे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मोरे यांनी भोंगाविरोधी भूमिका घेतल्याने त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याची चर्चा आहे. (फाइल फोटो)
-
मात्र बाबर यांच्या नियुक्तीनंतर मोरेंनी आपणच केवळ एका वर्षासाठी अध्यक्ष पद राज ठाकरेंकडून मागितलं होतं असं म्हटलेलं. (फाइल फोटो)
-
कालच झालेल्या रामनवमीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरेंनी वनवासाचा उल्लेक असणारं सूचक ट्विट केलं असून सध्या आपण संघर्ष करत असल्याचं त्यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलं आहे.
-
आता १२ एप्रिलच्या सभेला वसंत मोरे उपस्थित राहतात का?, राज ठाकरे उद्याच्या सभेत काय बोलतात याबद्दल सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली आहे. (फाइल फोटो)

पैसा, पैसा आणि फक्त पैसा… २०२६ पर्यंत राहू देणार ‘या’ तीन राशींच्या भाग्याची साथ; पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा कमावणार