-
माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच चर्चेत असतात.
-
कधी त्यांच्या नवीन गाण्यामुळे तर कधी विरोधकांना आपल्या खास शैलीत उत्तरं दिल्यामुळे अमृता फडणवीस चर्चेचा विषय ठरतात.
-
परंतु, आता कान्स चित्रपट महोत्सवातील लूकमुळे अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
-
आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाच्या मानल्या जाणाऱ्या कान्स चित्रपट महोत्सवाला अमृता फडणवीसांनी हजेरी लावली.
-
या महोत्सवातील फोटो अमृता फडणवीसांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
कान्स चित्रपट महोत्सवासाठी अमृता फडणवीसांनी खास लूक केला होता.
-
काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करत अमृता फडणवीस रेड कार्पेटवर अवतरलेल्या दिसल्या.
-
अमृता फडणवीस यांच्या महोत्सवातील लूकची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
-
कान्स चित्रपट महोत्सव १७ मे पासून सुरू झाला आहे.
-
यंदाचा हा ७५वा कान्स चित्रपट महोत्सव २८ मे पर्यंत असणार आहे.
-
कान्स चित्रपट महोत्सवातील खास फोटो.
-
(सर्व फोटो : अमृता फडणवीस, फेस्टिवल दी कान्स/ ट्विटर)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल