-
महाराष्ट्रात गेले अनेक दिवस सुरु असलेल्या राजकीय नाट्यानंतर अखेर काल एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या पत्नींबद्दल जाणून घेऊया.
-
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचे नाव अमृता फडणवीस असे आहे.
-
२००५ साली ते विवाहबंधनात अडकले. त्यांचा प्रेमविवाह झाला आहे.
-
त्यांना दिवीजा नावाची मुलगी आहे.
-
अमृता या बॅंक कर्मचारी आहेत. त्यासोबतच त्या गायिकादेखील आहेत.
-
‘शिव तांडव स्त्रोत’, ‘बेटिया’, ‘ये नयन डरे डरे’ अशी अनेक अल्बमची गाणी त्यांनी गायली आहेत.
-
अमृता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असतात. आपली मते त्या अनेकदा ठामपणे मांडताना दिसतात.
-
देवेंद्र फडणवीसांची एकूण संपत्ती जवळपास नऊ कोटी इतकी आहे. तर त्यांच्या पत्नी अमृता यांच्या नावावर चार कोटींची मालमत्ता आहे.
-
रिक्षाचालक ते मुख्यमंत्री असा प्रवास करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या पत्नीचं नाव लता शिंदे असं आहे.
-
आर्थिक परिस्थितीमुळे एकनाथ शिंदेंना हातभार लावण्यासाठी त्या छोटा व्यवसाय करायच्या अशी माहिती आहे.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मुलगा श्रीकांत शिंदे पेशाने डॉक्टर आहेत. कल्याण मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडूण आले आहेत.
-
एकनाथ शिंदेंकडे एकूण ११ कोटींची मालमत्ता आहे. त्यापैकी पत्नीच्या नावावर सुमारे ६.५ कोटींची संपत्ती आहे.
-
(सर्व फोटो : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)

India Pakistan War Live Updates : माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरु! पाकिस्तानच्या प्रत्येक कारवाईला भारताचा ‘करारा जवाब’