-
यापैकी काही अभिनेते आणि अभिनेत्रींनी आपल्या प्रेमासाठी असं काही केलं होतं की ज्याबद्दल कायमच अशा प्रेमकथांबद्दल चर्चा झाल्यावर बोललं जातं. यामध्ये अगदी आमिर खान पासून धर्मेंद्रपर्यंतच्या लोकप्रिय कलाकारांचा समावेश आहेत. पाहूयात अशाच काही प्रेमकथा आणि प्रेमासाठी कलाकारांनी केलेल्या काही फारच आगळ्यावेगळ्या गोष्टी…
-
करीना कपूर सैफ अली खानसोबत लग्न करण्याआधी शाहिद कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती.
-
रिलेशनशीपमध्ये असताना करीनाने शाहिदसाठी मांसाहार सोडला होता.
-
दीपिका पदुकोण एकेकाळी रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती.
-
या दोघांच्या प्रेमाबद्दल सगळीकडे चर्चा होती. अगदी पापाराझींपासून ते पेज थ्रीपर्यंत यांच्या भेटीगाठी आणि रोमान्सच्या बातम्या छापून आलेल्या.
-
रणबीरच्या प्रेमात दीपिकाने तिच्या मानेवर त्याच्या नावाचं पहिलं अक्षर टॅटू स्वरुपात गोंदवून घेतलं होतं.
-
हेमा मालिनी ही धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी आहे.
-
धर्मेंद्र यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्याच्याआधीच हेमा यांच्याशी लग्न केलं होतं.
-
एकमेकांसोबत लग्न करण्यासाठी हेमा आणि धर्मेंद्र यांना इस्लाम धर्म स्वीकारावा लागला होता.
-
विराट कोहलीला बटर चिकन फार आवडतं. मात्र त्याने अनुष्कासाठी आपल्या खाण्याच्या सवयी बदलल्या.
-
अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये असल्यापासून विराटने मांसाहार सोडला आहे.
-
अनुष्का ही शाकाहारी आहे. तिला प्राण्यांबद्दल विशेष प्रेम आहे.
-
त्यामुळेच अनुष्कासाठी विराट वीगन झाला आहे. म्हणजेच तो प्राण्यांपासून तयार होणारे कोणतेही पदार्थ खात नाही.
-
आपल्या जोडीदारासाठी काहीही करणाऱ्यांमध्ये अभिनेत्री आणि मॉडेल याना गुप्ताचंही नाव आवर्जून घ्यावं लागेल.
-
याना गुप्ताने तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी तिच्या प्रियकराचं नाव गोंदवून घेतलं होतं.
-
आमिर खानचं पहिलं प्रेम म्हणजे रीना दत्त. रीनासोबत आमिरने लग्नही केलं होतं.
-
नंतर आमिरने रीनाला घटस्फोट देऊन किरण रावसोबत लग्न केलं.
-
जेव्हा आमिर खान रीनासोबत होता तेव्हा तो तिच्या प्रेमात एवढा अखंड बुडालेला की एकदा प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याने रक्ताने पत्र लिहिलं होतं.
