-
शिवसेनेतील बंडानंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शपथ घेतल्यानंतर राज्यातील राजकारणाला वेगळीच दिशा मिळाली.
-
शिवसेनेतील आमदारांनंतर खासदारही शिंदे गटात सामील झाले. दिवसेंदिवस पडत चाललेल्या खिंडारामुळे शिवसेनेची चिंता वाढत आहे.
-
अशातच मागील काही दिवसांत ठाकरे घराण्यातील काही व्यक्तींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यामुळे समाजमाध्यमांमध्ये याबद्दल चर्चा रंगल्या आहेत.
-
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाला पाठिंबा दर्शविला.
-
तर उद्धव ठाकरेंच्या वहिनी स्मिता ठाकरे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली.
-
या भेटीगाठींनंतर मात्र सोशल मीडियावर ठाकरे घराण्यासोबतच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीची जोरदार चर्चा सुरू आहे.
-
बाळासाहेब ठाकरेंच्या मांडीवर बसलेल्या ठाकरे घराण्यातील या सुपुत्राचं नाव आहे ऐश्वर्य ठाकरे.
-
ऐश्वर्य हा बाळासाहेबांचे पुत्र जयदेव ठाकरे आणि त्यांची पत्नी स्मिता ठाकरे यांचा धाकटा मुलगा आहे.
-
‘अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे’ येथून त्याने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.
-
आईप्रमाणेच ऐश्वर्यलाही अभिनयाची आवड आहे.
-
अभिनय करण्यासोबतच तो एक उत्तम डान्सरही आहे.
-
ऐश्वर्य सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतो.
-
त्याचे अनेक फोटो तो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत असतो.
-
ऐश्वर्य त्याच्या फिटनेसकडेही विशेष लक्ष देत असल्याचं त्याच्या फोटोंमधून दिसून येतं.
-
ऐश्वर्यच्या वाढदिवसाला बॉलिवूड अभिनेत्री अलाया फर्निचरवालाने हजेरी लावली होती.
-
तेव्हा ऐश्वर्य आणि अलाया एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
-
स्मिता ठाकरे यांनी ऐश्वर्यच्या वाढदिवसाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यावरून या चर्चांना उधाण आलं होतं.
-
ऐश्वर्यच्या वाढदिवसाचे फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
-
मात्र यावर अभिनेत्री अलाया फर्निचरवालाने खुलासा करत “आम्ही खूप आधीपासून एकमेकांना ओळखत असून चांगले मित्र आहोत”, असं म्हटलं होतं.
-
राज्यातील राजकीय घडामोडींमुळे आता पुन्हा एकदा ऐश्वर्य सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
स्मिता ठाकरे यांनी १९८६ मध्ये जयदेव ठाकरेंसोबत लग्नगाठ बांधली. परंतु, काही कारणांमुळे २००४ साली ते विभक्त झाले.
-
त्यांना राहुल आणि ऐश्वर्य ही दोन मुले आहेत.
-
(सर्व फोटो : ऐश्वर्य ठाकरे, स्मिता ठाकरे/ इन्स्टाग्राम)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल