-
बर्मिंगहॅम २०२२ कॉमनवेल्थ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने चमकदार कामगिरी केली आहे.
-
या स्पर्धेत अविनाशनने रौप्य पदक जिंकले आहे.
-
अविनाश हा सुवर्णपदक विजेत्या अब्राहम किबिव्होटपेक्षा फक्त ०.५ सेकंद मागे होता.
-
आत्तापर्यंत या स्पर्धेत पहिले तिनही क्रमांकावर केनियाचे स्पर्धेक असायचे. मात्र, पहिल्यांदा अविनाशने हा विक्रम मोडीत काढला आहे.
-
या स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारा अविनाश हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
-
या विजयानंतर अविनाशवर सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अविनाशचे कौतुक केले आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रोत्साहनामुळेच मला यश मिळाले असल्याची भावना अविनाशने व्यक्त केली आहे.
-
अविनाश हा मूळचा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा गावचा.
-
अविनाशने स्वत:ला खेळाकडे नेण्याचा विचार कधीच केला नाही. त्याला सैन्यात भरती होऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा होता.
-
१२वी नंतर अविनाश सैन्यात भरती झाला आणि ५ महार रेजिमेंटचा भाग बनले.
-
आर्मीमध्ये असताना त्याला अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळाली.
-
२०१७ मध्ये त्याच्या सैन्य प्रशिक्षकाने त्याला स्टीपलचेसमध्ये धावण्याचा सल्ला दिला.
-
२०१८ साली भुवनेश्वर येथे झालेल्या ओपन नॅशनल स्पर्धेमध्ये साबळेने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये ८:२९.८८ वेळ नोंदवत ३० वर्षांचा राष्ट्रीय विक्रम मोडला.
-
२०१९ साली पटियाला येथे झालेल्या फेडरेशन कपमध्ये साबळेने नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला.
-
या स्पर्धेत जरी रौप्य पदक जिंकले तरी येणाऱ्या काळात सुर्वणपदक जिंकण्याचा मानस अविनाशने व्यक्त केला आहे.

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”