-
आज शिवसेना भवनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची राज्यातील १०० ते १५० वकिलांनी भेट घेतली आहे.
-
शिवसेना पक्षासोबत आम्हाला काम करण्याची इच्छा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
-
याच पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेची ‘महाराष्ट्र न्यायिक विधी सेना’ स्थापन करण्यात आली आहे.
-
ही संघटना म्हणजे शिवसेनेची वकील संघटना असेल.
-
या संघटनेमार्फत गरजू नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना कायदेशीर मदत दिली जाणार आहे.
-
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या संघटनेची घोषणा करण्यात आली.
-
पुढील महिन्यात आणखी तीन ते चार हजार वकील या संघटनेत सामील होती, अशी माहिती मिळत आहे.
-
शिवसेना भवनात पार पडलेल्या या बैठकीला आज १०० ते १५० वकील उपस्थित होते.
-
या संघटनेच्या माध्यमातून पक्षाचं न्यायालयीन कामकाजही पाहिलं जाणार आहे.

कधीच गॅस होणार नाही, पोटात कुजलेली सगळी घाण येईल बाहेर; आठवड्यातून एकदा फक्त ‘ही’ फळं खा