-
Interesting Facts About Indian Railways : भारतीय रेल्वे हे आशियातील सर्वात मोठे आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वे नेटवर्क आहे. (PTI Photo)
-
भारतीय रेल्वे ट्रॅकची एकूण लांबी सुमारे ६७,३६८ किमी आहे. (Photo: Freepik)
-
बोरी बंदर (मुंबई) हे देशातील पहिले रेल्वे स्थानक आहे. (Photo: Express Archive)
-
भारताचा पहिला रेल्वे प्रवास १८५३ मध्ये बोरी बंदर ते ठाणे असा होता. (Photo: Twitter/Mumbai Heritage)
-
मुंबईकरांना एकाच जागी उभ्या असलेल्या वाफेच्या इंजिनांची सवय होती. ( Source: Twitter/ Ministry of Railways)
-
मुंबईकरांना एकाच जागी उभ्या असलेल्या वाफेच्या इंजिनांची सवय होती. ( Source: Twitter/ Ministry of Railways)
-
पण रूळांवर धावणारं हे वाफेचं इंजिन म्हणजे मुंबईकरांसाठीही नवलाई होती. (Picture for representation)
-
तब्बल २०० मजुरांनी हे इंजिन बंदरावरून भायखळ्याच्या रेल्वे परिसरात खेचत नेलं होतं.
-
विशेष म्हणजे १६६ वर्षांपूर्वी बोरीबंदर ते ठाणे हे अंतर कापण्यासाठी ५७ मिनिटं लागली होती. आता १६६ वर्षांनंतरही हे अंतर पार करण्यासाठी स्लो लोकलने साधारण तेवढाच वेळ लागतो.
-
हुबळी जंक्शन प्लॅटफॉर्म हे भारतातील जगातील सर्वात मोठे रेल्वे प्लॅटफॉर्म आहे.
-
त्याची लांबी १४०० मीटर आहे. हुबळी स्थानकावरही प्रवाशांची मोठी गर्दी असते. (Photo: India Rail Info)
-
मथुरा हे देशातील सर्वात मोठे जंक्शन आहे. त्याची लाइन कनेक्टिव्हिटी देशातील सर्व प्रमुख शहरांशी जोडलेली आहे. (Photo: India Rail Info)
-
याशिवाय या जंक्शनमध्ये १० प्लॅटफॉर्म आणि ७ वेगवेगळे रेल्वे मार्ग आहेत.
-
भारतातील पहिली रेल्वे कार्यशाळा ८ फेब्रुवारी १८६२ रोजी स्थापन झाली.
-
ही कार्यशाळा जमालपूर बिहारमध्ये आहे आणि आज ती भारतातील सर्वात आधुनिक दुरुस्ती कार्यशाळा आहे.
किडनी अन् लिव्हर खराब होणार नाही! फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, हृदयाच्या बंद झालेल्या नसा होऊ शकतात मोकळ्या