-
अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद तिच्या विचित्र फॅशनसाठी कायम चर्चेत असते.
-
तिचे कपडे आणि ड्रेसिंग स्टाईल विचित्र असलं तरी तिचे सोशल मीडियावर चांगलेच फॉलोअर्स आहेत.
-
कधी आपल्याच फोटोंपासून ड्रेस बनवून तो परिधान करणारी उर्फी फक्त कपडेच नव्हे तर तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील प्रसिद्ध आहे.
-
तिला कपड्यांवरून अनेकदा ट्रोल केलं जातं.
-
पण ती ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत असते.
-
बरेच जण तिला ‘तुझ्याकडे कपडे घ्यायला पैसे नाहीत का,’ असंही सुनावत असतात. त्यामुळेच आज आपण उर्फीच्या संपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत.
-
आपल्या हटके फॅशनसाठी ओळखली जाणारी उर्फी कोट्यवधींची मालकीण आहे.
-
या विचित्र कपड्यांमुळे उर्फी लाखोंची कमाई करते आणि लक्झरी लाइफ जगते.
-
उर्फी जावेद एका एपिसोडसाठी २५- ३५ हजार रुपये मानधन घेते.
-
ती महिन्याला जवळपास ३० लाख रुपये कमावते.
-
उर्फीची एकूण संपत्ती १७२ कोटींच्या घरात असल्याचं वृत्त अमर उजालाने रिपोर्ट्सच्या हवाल्याने दिलंय.
-
याशिवाय उर्फीजवळ स्वतःचं घर आणि लक्झरी कारही आहे.
-
उर्फीजवळ Jeep Compass SUV कार असून तिची किंमत २५ लाख रुपये आहे.
-
उर्फीने आतापर्यंत ‘दुर्गा’, ‘सात फेरों की हेराफेरी’, ‘बेपनाह’, ‘जीजी मां’, ‘डायन’, ‘रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकांमध्ये काम केलंय.
-
(सर्व फोटो- उर्फी जावेदच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

मगरीनं बघता बघता १३ वर्षाच्या मुलाला खाऊन टाकलं; गावकरी बघत राहिले अन्…, रडणाऱ्या मुलाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल