-
केंद्रीय निवडणूक आयोगानं शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव दिल्यानंतर ‘ढाल-तलवार’ हे निवडणूक चिन्ह दिलं आहे.
-
निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटासह शिंदे गटाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
-
आम्हाला ‘ढाल-तलवार’ ही निशाणी दिली आहे आणि निवडणूक आयोगाचा निकाल आम्हाला मान्य आहे. ढाल-तलवार ही शिवसेनेची जुनीच निशाणी आहे. आपली बाळासाहेबांची शिवसेना आहे. – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
-
सज्जनांसाठी ढाल आणि दुर्जनांवर वार करायला तलवार. छत्रपती शिवाजी महाराजांची निशाणी आम्हाला मिळाली आहे. – शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के
-
शिंदे गटाला पाठीत खुपसण्यासाठी काहीतरी शस्त्र पाहिजे होतं, ते शस्त्र त्यांना आता देण्यात आलं आहे. त्यांचे जे चाणक्य (भाजपा) आहेत, त्यांनी शिंदे गटाच्या हाती तलवार दिली असून ते खुपसण्यास सांगत आहेत. – अरविंद सावंत
-
भाजपानं स्वत:साठी ढाल घेतली आहे आणि पाठीत खुपसण्यासाठी शिंदे गटाच्या हाती तलवार दिली आहे. – अरविंद सावंत
-
शिंदे गटाला मिळालेल्या चिन्हामध्ये ढालही आहे आणि तलवारही आहे. ढाल आणि तलवार ऐतिहासिक चिन्ह आहे. या चिन्हासंबंधित शिवाजी महाराजांपासून अनेक उदाहरण देता येतील. – गिरीश महाजन (कॅबिनेट मंत्री भाजपा)
-
मला वाटते ही ढाल भाजपाची आहे आणि तलवार गद्दारांची आहे. ही ढाल बोथट होत असून तलवारीला महाराष्ट्र नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही. – अंबादास दानवे
-
अगदी परफेक्ट पक्षचिन्ह आहे. आता आमची ढाल-तलवार कशी चमकते ते बघा. ढालीने जनतेचं रक्षण करायचं आणि शत्रू अंगावर आला तर तलावर समोर धरायची. – भरत गोगावले
-
आम्ही निवडणूक आयोगाच्या निर्णयावर समाधानी आहोत. त्यामुळे आता आम्ही ढाल तलवार घेऊन जनतेसमोर जाऊ. – संदीपान भुमरे
-
शिवसेना म्हटलं की तलवारीची गरज आहे आणि ढालीचीही गरज आहे. ढाल तलवार हे चिन्ह जुनं आहे. ते आम्हाला मिळणं हा शुभ संकेत आहे. आम्हाला मिळालेलं नाव बाळासाहेबांची शिवसेना असं आहे. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. दुसरीकडे ती उद्धव सेना आहे. – किरण पावसकर
-
आम्ही निवडणूक आयोगाला बहुमताच्या जोरावर ‘धनुष्यबाण’ चिन्ह मागितलं होते. मात्र, निवडणूक आयोगाचा निर्णय अन्यायकारक आहे. ‘बाळासाहेबांची शिवसेना’, हे नाव आणि ‘ढाल-तलवार’, हे चिन्ह अंधेरी पोटनिवडणुकीसाठी असणार आहे. – उदय सामंत
प्रसिद्ध अभिनेत्याने घटस्फोटानंतर ९ वर्षांनी केला साखरपुडा; अमृता खानविलकर कमेंट करत म्हणाली…