-
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंडखोरी केल्याने शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे.
-
शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं असून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आलं आहे. हे सरकार स्थापन करत असताना अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत.
-
दरम्यान, शिंदे गटाची बंडखोरी यशस्वी ठरणार की फसणार? याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. या सर्व घडामोडींनंतर शिंदे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.
-
आमची बंडखोरी फसली असती, तर आम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहावी लागली असती, असं विधान गुलाबराव पाटलांनी केलं आहे.
-
ते जळगावातील एका कार्यक्रमात बोलत होते.
-
यावेळी केलेल्या भाषणात गुलाबराव पाटील म्हणाले, “मी भाजपावाल्यांना नेहमी बोलतो की, आम्ही सट्टा खेळून तुमच्याकडे आलोय.”
-
आमच्या आयुष्याचा आम्ही सट्टा खेळला. आम्ही आठ लोकांनी मंत्रीपद सोडून दिलं होतं. – गुलाबराव पाटील
-
आमच्याकडे बहुमत आलं नसतं तर आम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहावी लागली असती. – गुलाबराव पाटील
-
लोकं साधं सरपंचपदही सोडत नाही. पण तेव्हा आम्ही आठ जणांनी मंत्रीपद सोडलं. – गुलाबराव पाटील
-
त्यावेळी आम्हाला ३८ आमदार हवे होते. मी ३३ वा होतो. – गुलाबराव पाटील
-
आणखी पाच आमदार आले नसते, तर माझा कार्यक्रम आटोपला होता. – गुलाबराव पाटील
-
आम्हाला पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं लागलं असतं किंवा सरकार कोसळलं असतं- गुलाबराव पाटील (सर्व फोटो- संग्रहित/लोकसत्ता)
बी. आर. गवई यांच्या निवृत्तीनंतर भारताचे सरन्यायधीश होणारे न्यायमूर्ती सूर्यकांत कोण आहेत?