-
एका व्यक्तीने आपल्या श्वानासह लडाखमधील सर्वात उच वाहतूक मार्गावरून प्रवास केला. (source – one_crazy_guy/instagram)
-
चाऊ सुरेंग राजकंवर ही व्यक्ती आपली पाळीव श्वान बेलासह कस्टमाइज्ड बाईकवर चित्तथरारक भागातून प्रवास करताना एका व्हिडिओत दिसून आली. (source – one_crazy_guy/instagram)
-
बेलाला दिल्लीहून लडाख घेऊन जाणे हा सोपा निर्णय नव्हता, यासाठी बाईकमध्ये बदल करण्यात आल्याचे राजकंवर यांनी सांगितले. (source – one_crazy_guy/instagram)
-
चाऊ सुरेंग राजकंवर आणि बेला या दोघांनीही आधी झंकसार सर्किट आणि नंतर लडाख सर्किंट बाईकवरून पूर्ण केले. (source – one_crazy_guy/instagram)
-
लडाखमध्ये अनेक माउंटेन क्रॉस, वॉटर क्रॉस, हाय अल्टीट्यूड वाळवंटामधून प्रवास केलानंतर उमलिंगला पासमध्ये तिरंगा फडकवल्याचे चाऊ यांनी व्हिडिओतून सांगितले. (source – one_crazy_guy/instagram)
-
चाऊ यांना श्वानासोबत बाईकवर या खडतर भागातून प्रवास करून आपण एक नवीन विश्व विक्रम केल्याची आशा आहे. (source – one_crazy_guy/instagram)
-
दोघेही खडतर भागातून प्रवास करताना व्हिडिओमध्ये दिसून येतात. (source – one_crazy_guy/instagram)
-
व्हिडिओ पहिल्यांदा १६ नोव्हेंबरला शेअर करण्यात आला होता. व्हिडिओ लोकांची प्रचंड पसंती मिळत आहे. (source – one_crazy_guy/instagram)
-
अनेक व्यक्तींनी दोघांचे कौतुक केले असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (source – one_crazy_guy/instagram)

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case