-
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
-
आज शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली.
-
यावेळी शरद पवारांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं.
-
मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तीव्र भावना उमटल्या- शरद पवार
-
मी निर्णयाचा पुनर्विचार करावा म्हणून माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटीत होऊन एकमुखाने आवाहन केलं – शरद पवार
-
देशभरातून विशेषत: महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षाचे नेते आणि सहकारी, मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, अशी विनंती केली – शरद पवार
-
लोक माझे सांगाती, हेच माझ्या परीने प्रदीर्घ सार्वजनिक जीवनाचे गमक आहे – शरद पवार
-
माझ्याकडून आपल्या भावनाचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारवून गेलो आहे- शरद पवार
-
माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहनं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत त्यांनी घेतलेला निर्णय याचा विचार करून मी पुन्हा अध्यक्षपदी रहावे या निर्णयाचा मान राखून राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे – शरद पवार
-
उत्तराधिकारी असणं हे माझं स्पष्ट मत आहे. मी आता अधिक जोमानं काम करणार आहे – शरद पवार
-
पक्षात नव्या नेतृत्वासाठी संघटनात्मक बदल घडवणार आहे – शरद पवार
-
आपण सर्वजण माझ्याबरोबर राहिलात, म्हणून मी तुमचा कायमचा ऋणी राहीन – शरद पवार

Nilesh Chavan: वैष्णवीच्या कुटुंबाला बंदूक दाखविणाऱ्या निलेश चव्हाणवर अजित पवार संतापले; म्हणाले, “त्यालाही…”