-    पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान यांना गुरुवारी पाकिस्तान रेंजर्संनी अटक केली होती. 
-    इम्रान खान सुनावणीसाठी इस्लामाबाद न्यायालयात हजर झाले होते. याचवेळी पोलिसांनी त्यांना अटक केली. 
-    पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर असल्याचं सांगितलं आहे. 
-    इम्रान खान यांची तातडीने सुटका करण्यात यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. 
-    गुरुवारी इम्रान खान यांना अटक केल्यानंतर त्यांच्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. 
-    या याचिकेवर पाकिस्तानचे सरन्यायाधीश उमर अता बंदियाल, न्यायमूर्ती मुहम्मद अली मजहर आणि न्यायमूर्ती अतहर मिनल्लाह या तीन सदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी पार पडली. 
-    न्यायाधीशांनी इम्रान खान यांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले. 
-    ७० वर्षीय इम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयात हजर केले असता त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. 
-    इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या बाहेरून पाकिस्तानी रेंजर्संनी आपलं अपहरण केलं. एवढंच नव्हे तर त्यांनी आपल्याला काठीने मारहाण केली.- इम्रान खान 
-    एखाद्या गुन्हेगारालाही अशी वागणूक दिली जात नाही. माझ्याबरोबर काय घडतंय? हेही मला अजून माहीत नाही, असा इम्रान खान यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितंल. 
-    इम्रान खान यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने सुटकेचे आदेश दिले असले तरी इम्रान खान यांना अद्याप मुक्त करण्यात आलं नाही. 
-    सुरक्षेचं कारण सांगून घरी जाण्याची परवानगी नाकारली आहे. त्यांना इस्लामाबादच्या पोलीस लाईन गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात येणार आहे. (सर्व फोटो सौजन्य-इंडियन एक्स्प्रेस/लोकसत्ता) 
 
  लोकप्रिय मराठमोळी गायिका लवकरच होणार आई! लग्नानंतर तीन वर्षांनी दिली खुशखबर; शेअर केली खास पोस्ट 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  