-
जर तुम्हीही बचत करण्यासाठी २००० रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात घरात ठेवल्या असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
-
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) २००० रुपयांच्या नोटा वितरणातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
या नोटा ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत बाजारात वैध मानल्या जाणार असल्या तरी २३ मे २०२३ पासून रिझर्व्ह बँकेने त्या बदलण्याच्या किंवा बँकेत जमा करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.
-
२००० रुपयांच्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात चलनात आल्या असून, त्याचा काळा पैसा म्हणूनही वापर केला जात आहे, त्यामुळे या नोटा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला, हेही यामागचे प्रमुख कारण मानले जात आहे.
-
तुमच्या २००० रुपयांच्या नोटा बदलताना खोट्या आढळून आल्यास काय होईल, याच प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत.
-
बनावट नोटांना सामोरे जाण्यासाठी बँकांनी मध्यवर्ती बँकेच्या मुख्य निर्देशांचे ‘काळजीपूर्वक’ पालन केले पाहिजे, असंही आरबीआयनं सांगितलं आहे.
-
काऊंटरवर बँकेच्या नोटा खऱ्या आहेत की खोट्या मशीनद्वारे तपासल्या जातील. बॅंकेकडून नोट बनावट असल्याचे आढळल्यास ग्राहकाला कोणतेही क्रेडिट दिले जाणार नाही.
-
बनावट म्हणून निर्धारित केलेल्या नोटांवर “बनावट नोट” असा शिक्का मारला जाईल आणि त्या जप्त केल्या जातील. जप्त केलेल्या प्रत्येक नोटेचा तपशील वेगळ्या रजिस्टरमध्ये टाकला जाईल.
-
बनावट नोटा बँकेच्या शाखेत परत केल्या जाणार नाहीत किंवा नष्ट केल्या जाणार नाहीत.
-
जेव्हा एखादी बँक नोट काउंटरवर जमा करताना ती बनावट असल्याचे आढळल्यास बँकेच्या शाखेद्वारे विहित नमुन्यातील पोचपावती निविदाकाराला दिली जाणार आहे.
-
खोट्या नोटा शोधण्यासाठी पोलिसांना कसे कळवले जावे हे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट केले आहे.
-
मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बनावट नोटांच्या वितरणात सामील व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी, बँकांना त्यांच्या अंतर्गत धोरणानुसार बँक परिसर आणि काउंटर सीसीटीव्ही निगराणीखाली ठेवण्याची आणि रेकॉर्डिंग ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
-
-
-

American Student Visa : “…तर व्हिसा होईल रद्द”, अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना इशारा