हॉस्पिटलमधील डॉक्टर्स अनेकदा हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. कपडे तर कुठल्याही रंगाचे घालता येतील पण फक्त या दोनच रंगाचे कपडे का घातले जातात. यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का?खरंतर पूर्वी ऑपरेशन करताना डॉक्टर पांढऱ्या कपड्यातच असायचे.परंतु १९१४ मध्ये एका डॉक्टरने तो बदलून हिरवा केला. तेव्हापासून हा ड्रेस लोकप्रिय झाला. आजकाल काही डॉक्टर निळ्या रंगाचे कपडेही घालतात.ऑपरेशनवेळी डॉक्टर हिरव्या रंगाचे कपडे घालतात कारण एका रिपोर्टनुसार, शस्त्रक्रियेदरम्यान हिरव्या कपड्यामुळे डोळ्यांना थोडा आराम मिळतो. शस्त्रकिया करताना बारकाईने लक्ष असणं गरजेचं असतं. ऑपरेशन दरम्यान डोळे उघडे ठेवावे लागतात, ज्यामुळे डोळे थकतात, जर हिरवा रंग त्वरित दिसला तर डोळे थंड होतात. हिरवा रंग बघून तणाव दूर होतो.शस्त्रक्रिया करताना मोठ्या प्रमाणावर रक्त बाहेर येतं. रक्ताचा लाल रंग निळ्यावर उठून दिसतो. परंतु त्याचा प्रभाव मात्र जाणवत नाही. निळ्यावर लाल रंग पाहिल्याच मेंदूला फारसं विचित्र वाटत नाही. त्यामुळे रंग शास्त्राचा विचार करूनच ऑपरेशन करताना डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाचेच कपडे घालतात.वैज्ञानिक भाषेत याला ‘व्हिज्युअल इल्युजन’ म्हणतात. खरंतर पांढऱ्या प्रकाशात इंद्रधनुष्याचे सर्व रंग असतात. लाल रंगाच्या प्रभावामुळे डोळ्यांना पांढऱ्या पृष्ठभागावरूनही हिरवा रंग दिसण्याचा भास होतो. जेव्हा डॉक्टर रुग्णाच्या लाल रंगाकडे पाहून त्याच्या स्टाफने आधीच घातलेल्या हिरव्या किंवा निळ्या रंगाकडे बघेल तेव्हा हिरव्या रंगाचा भ्रम त्यात लगेच मिक्स होईल आणि त्यामुळे कोणताही व्हिज्युअल डिस्टरब्रँस होणार नाही. (फोटो सौजन्य : freepik)