-
Gauri Sawant Interview: तृतीयपंथींच्या आयुष्याच्या खाचखळग्यांचं दर्शन घडवणारा ‘ताली’ सिनेमा तृतीयपंथी समुदायाचे नेतृत्व करणाऱ्या गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारित आहे
-
गौरी सावंत यांच्यासारख्या अनेक नेतृत्वांनी तृतीयपंथींच्या प्रगतीसाठी लढून आपले हक्क मिळवले आहेत.
-
साहजिकच, ज्यांना समाजाचा भागच मानलं जात नव्हतं त्यांच्याविषयी अनेक सांगोपांगी गोष्टी चर्चेत येणं हे साहजिक आहे. अशाच काही गैरसमजुतींवर ‘बस बाई बस’ या शोमध्ये गौरी सावंत यांनी उत्तर दिलं आहे.
-
गौरी सावंत सांगतात, मला रिक्षाने येता जाता पण कित्येकदा रिक्षावाल्यांनी विचारलं आहे की तुमच्यात मृतदेहांना चपलेने मारतात का? तुमच्या समुदायातील मृताची प्रेतयात्रा पाहिली तर माणूस श्रीमंत होतो का?
-
यावर उत्तर एकच आहे की आम्ही पण माणसं आहोत आणि आम्हालाही मृत्यू तेवढाच दुःखद आहे, चपलेने मारणं या निव्वळ अफवा आहेत
-
एखाद्याच्या निधनानंतर जसे शेजारपाजारचे चार खांदेकरी त्या मृतदेहाला घेऊन जातात व त्यांच्या धर्म व जीवनशैलीनुसार अंत्यसंस्कार केले जाते.
-
आणखी एक प्रश्न म्हणजे तृतीयपंथींची अंत्ययात्रा पाहिल्यावर श्रीमंत होता येतं का?
-
यावर गौरी सावंत म्हणाल्या की, मी आयुष्यात एवढ्या जणांचे मृत्यू पाहिले मी काय श्रीमंत झाले का? असाही प्रश्न करून गौरी सावंत यांनी हा मुद्दाही अंधश्रद्धा असल्याचे सांगितले.
-
गौरी सावंत म्हणतात की, “जर मला पुढचे कितीही जन्म मिळाले तर मी पुन्हा हाच जन्म घेईन”.
रात्री झोपण्याआधी गूळ आणि तूप नक्की खा; सकाळी परिणाम पाहून थक्क व्हाल, डॉक्टरांनी स्वत: दिली माहिती