-
‘फेविकॉल किंवा फेविक्विक’चा वापर कोणतीही वस्तू चिटकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.
-
बाटलीत भरलेले पांढरे फेविकॉल वस्तू सहज चिकटवते. म्हणूनच फेविकॉलच्या मजबूत जोडबद्दल बरीच चर्चा आहे.
-
पण तुम्ही कधी विचार केलाय का, ज्या बाटलीत तो भरलेला असतो, त्या बाटलीला मात्र, तो का चिकटत नाही?
-
असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना, चला तर यामागचं काय कारण आहे जाणून घेऊया…
-
फेविकॉल किंवा कोणत्याही प्रकारचे गोंद बनवताना त्यात पॉलिमर्स केमिकल वापरले जाते. पॉलिमर्समध्ये लांब स्ट्रँड असतात.
-
फेविकॉल बनवताना अशा चिकट स्ट्रॅण्ड्सचा वापर केला जातो जे वस्तू खेचण्यास सक्षम असतील. ते बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यात पाणी मिसळले जाते.
-
ज्यामुळे ते द्रव स्वरूपात उपलब्ध होते. पाण्यामुळे ते कधीही सुकत नाही. यामुळेच ते नेहमी द्रव स्वरुपात उपलब्ध असते.
-
वास्तविक, गमची बाटली नेहमी बंद असते. बंद बाटलीत हवा पोहोचत नाही.
-
जेव्हा वापरायची असेल तेव्हा त्याचे झाकण उघडून आपण ते पुन्हा बंद करतो. यामुळे फेविकॉलमध्ये असणाऱ्या पॉलिमर्सचा हवेशी संबंध येत नाही.
-
त्यामुळे ते कायम द्रव (लिक्विड) स्वरूपात असते. त्यात असणाऱ्या पाण्यामुळेच ते बाटलीला चिकटत नाही.
-
म्हणून गमच्या बाटलीचे झाकण नेहमी बंद ठेवावे.
-
(फोटो सौजन्य : freepik )

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”