-
दिवाळीचा सण भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दिवाळी येण्यापूर्वीच लोक तयारी सुरू करतात. दिवाळीला अवघे काही दिवस उरले आहेत त्यामुळे घरापासून बाजारपेठांपर्यंत दिवाळीच्या तयारीचा उत्साह दिसून येत आहे. अशातच आता सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये मार्व्हलचे सुपरहीरो मिठाई आणि दिवे बनवताना दिसत आहेत. तर काही फटाके विकत आहेत. हे सर्व भन्नाट फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने तयार करण्यात आले आहेत.
-
या फोटोत स्पायडर-मॅन मिठाई बनवताना दिसत आहे.
-
हल्क दिवे बनवून त्यांची विक्रीही करतोय.
-
कॅप्टन अमेरिका हातात काजू-बदाम म्हणजेच सुका मेवा घेऊन तो विकताना दिसत आहे.
-
या फोटोत सुपरमॅन मेणबत्त्या विकताना दिसत आहे.
-
या फोटोत आयर्न मॅन स्पार्कलर (फुलबाजा) विकताना दिसत आहे.
-
बॅटमॅन विकतोय फटाके दिसत आहे.
-
मार्व्हलमधील नकारात्मक पात्र लोकी देखील दिवाळीच्या तयारीत व्यस्त दिसत आहे. तो लाडू विकताना दिसतोय.
-
गळ्यात रुद्राक्षाची माळ घालून थॉर दिवा घेऊन बसला आहे.
-
या फोटोत डॉक्टर स्ट्रेंज भारतीय पोशाखात दिवे विकत आहे.
-
अॅक्वामॅन फटाके आणि मेणबत्त्या पेटवताना दिसत आहे.
(फोटो सौजन्य : @sahixd/instagram)

Nilesh Chavan: वैष्णवीच्या कुटुंबाला बंदूक दाखविणाऱ्या निलेश चव्हाणवर अजित पवार संतापले; म्हणाले, “त्यालाही…”