-
उत्तर भारतात हिवाळ्याचे दमदार आगमन झाले आहे. काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमधील नैनीतालमध्ये तुफान बर्फ पडत असून पर्यटक मजा लुटत असल्याचे चित्र आहे. देशाच्या विविध भागांतून आणि परदेशातील पर्यटक काश्मीर खोरे आणि हिमाचल प्रदेशात निसर्ग सौंदर्याचा साक्षीदार होण्यासाठी आणि बर्फातील विविध खेळांचा आनंद घेण्यासाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी काश्मीर, हिमाचल प्रदेशातील अशीच काही खास फोटो घेऊन आलो आहे की, जे पाहून तुम्हाला काश्मीर खोऱ्यात जाण्याचा मोह आवरता येणार नाही. (पीटीआय फोटो)
-
गांदरबल जिल्ह्यातील बर्फवृष्टीनंतर सोनमर्ग आणि आजूबाजूच्या परिसरात पर्यटकांनी गर्दी केली आहे.(पीटीआय फोटो)
-
हिमाचलमधील लाहौल आणि स्पिति बर्फाच्या शुभ्र चादरीने झाकलेले आहेत. पर्यटक बर्फाच्छादित कोकसर येथे फोटो काढण्याचा आनंद घेताना दिसत आहेत.(पीटीआय फोटो)
-
जम्मू आणि काश्मीरमध्ये पूंछ येथे जोरदार बर्फवृष्टीन सुरु आहे. यात मुगल रोडवर प्रचंड बर्फाचा थर जमा झाला आहे, यामुळे आता लोकांनी गाड्या आणि रस्त्यांवरील बर्फ दूर करण्यास सुरुवात केली आहे. अशात येथील रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. (पीटीआय फोटो)
-
गांदरबल जिल्ह्यात बर्फवृष्टीनंतर बर्फाच्छादित सोनमर्ग येथे पर्यटक फोटो क्लिक करताना दिसत आहेत.(पीटीआय फोटो)
-
गांदरबल जिल्ह्यात पर्यटक मोसमातील पहिल्या बर्फवृष्टीचा खूप आनंद घेत आहेत.(पीटीआय फोटो)
-
लाहौल आणि स्पिति जिल्ह्यातील कोकसर येथे ताज्या हिमवर्षावानंतर पर्यटक सुखावले असून ते बर्फात ATV चालवण्याची मज्जा लुटत आहेत. (पीटीआय फोटो)
-
काश्मीरमधील तापमान सतत खाली उतरत असल्याने ठिकठिकाणी बर्फाच्या चादर पसरल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून येथे जोरदार बर्फवृष्टी होते आहे. (पीटीआय फोटो)
-
हिमाचलमधील पर्यटकांचे आकर्षण असणारे लाहौल आणि स्पिति जिल्ह्यातील शूलिंग गावात ही पारा खाली गेल्याने गोठले आहे. त्यामुळे पर्यटकांसोबतच स्थानिक लोक देखील या बर्फवारीचा आनंद घेत आहेत. (पीटीआय फोटो)

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक