-
Zodiac Sign: प्रेम आणि रिलेशनशिपच्या बाबतीत काही राशींचे लोक खूप ही रोमँटिक मानले जातात. हे लोक रिलेशनशिपमध्ये प्रेम आणि रोमान्स टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करतात आणि जोडीदारावर भरभरुन प्रेम करतात
-
. या ५ राशींचे लोक रिलेशनशिपमध्ये जोडीदाराला प्रेमाची कमतरता भासू देत नाही. हे लोक कोणत्याही संकटात आपल्या जोडीदाराची साथ सोडत नाही.
-
तसेच प्रेम आणि विश्वासासह नात्याचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न करतात. चला जाणून घेऊ या कोणत्या आहेत या राशी..
-
वृषभ: वृषभ राशीचा स्वामी ग्रह देखील शुक्र आहे. वृषभ राशीचे लोक छोट्या-छोट्या गोष्टींवरही जोडीदाराची प्रशंसा करायला विसरत नाहीत. त्यांचा साधा आणि सहज स्वभाव त्यांना त्यांच्या जोडीदाराला नात्यात जवळ आणण्यास मदत करतो. ते नात्याबद्दल खूप गंभीर आणि निष्ठावान आहेत. (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सिंह: सिंह राशीचे लोक नात्यात खूप उत्कट आणि उत्साही असतात. जोडीदाराबरोबरचे नाते दृढ करण्यासाठी ते खूप प्रयत्न करतात. नात्यात घालवलेले सर्व क्षण त्यांना संस्मरणीय बनवायचे आहेत. जोडीदाराप्रती त्यांचा प्रामाणिकपणा पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. सिंह राशीचे लोक संबंध दीर्घकाळ टिकण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कर्क: कर्क राशीचे लोकांना इतरांसाठी सहानुभूती असते आणि इतरांची काळजी घेण्यात नेहमी पुढे असतात. कर्क राशीचे लोक नात्यात खूप भावनिक असतात आणि आपल्या जोडीदाराच्या गरजा समजून घेतात आणि नात्यातील सर्व समस्या संवादातून सोडवतात. कर्क राशीचे लोक त्यांच्या जोडीदारांवर खूप प्रेम आणि काळजी घेतात. (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मीन: मीन राशीचे लोक लव्ह लाइफमध्ये खूप रोमँटिक असतात. ते त्यांच्या जोडीदाराबरोबरचे नाते मजबूत आणि दृढ करण्यावर विश्वास ठेवतात. ते जोडीदाराच्या गरजा आणि इच्छा समजून घेतात आणि जोडीदारावर प्रेम व्यक्त करण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत. नात्यातील प्रत्येक क्षण अविस्मरणीय करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तूळ: तूळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. तूळ राशीचे लोक रिलेशनशिपमध्ये जोडीदाराची प्रशंसा करायला मागेपुढे पाहत नाहीत. नात्यात प्रेम आणि उत्साह टिकवून ते जोडीदाराबरोबर मनमोकळेपणाने शेअर करतात आणि जोडीदाराच्या विचारांचा आदरही करतात. रिलेशनशिपमध्ये प्रेम आणि प्रामाणिकपणाच्या बाबतीत त्यांना कोणीही मात देऊ शकत नाही. (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
टीप – हा लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.

तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! सुरुवातीलाच दिसतात लक्षणे; दुर्लक्ष न करता खा ‘ही’ ४ फळे, होईल मोठा परिणाम