-
बुधवारी टाइम मॅगझीनने आपली २०२४ ची आवृत्ती जाहीर केली. या मॅगझीनमध्ये जगातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. या यादीमध्ये राजकारणी नेते, व्यावसायिक, कलाकार, आयकॉन, चित्रपट तारे, खेळाडू आणि शास्त्रज्ञ यांचा समावेश असतो; ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात लक्षणीय प्रभाव पाडला आहे.
-
जाणून घेऊया टाइम मॅगझीनमध्ये सर्वात प्रभावशाली लोकांच्या यादीमध्ये कोणत्या भारतीयांनी स्थान मिळवले आहे.
-
या यादीतील पहिल्या क्रमांकावर अजय बंगा आहेत, जे जागतिक बँकेचे अध्यक्ष आहेत. अजय बंगा पुणे येथे जन्मले होते, त्यांनी त्यांचं पुढचं शिक्षण दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमधून केलं. जागतिक बँकेतील त्यांच्या नेतृत्वाची आणि गरिबीचे निर्मूलन करून अनेक आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
-
टाइम मॅगझीनने सर्वात प्रभावशाली लोकांच्या यादीमध्ये बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टला तिच्या अभिनय क्षेत्रातील विशेष कौशल्यासाठी आणि नेटफ्लिक्सच्या “हार्ट ऑफ स्टोन”मधून आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी निवडले आहे.
-
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी तिसऱ्यांदा या यादीत आपले स्थान कायम ठेवले आहे. त्यांच्या प्रभावशाली भूमिकेबद्दल नडेला यांचे कौतुक केले जाते. ‘AI’क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना तांत्रिक प्रगतीचा कारभारी असे घोषित केले आहे.
-
ऑलिम्पिक पदक जिंकणारी भारताची पहिली आणि एकमेव महिला कुस्तीपटू म्हणून साक्षी मलिकला या यादीत सन्मानित करण्यात आले.
-
अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून सिनेमातील आपल्या प्रभावी योगदानासाठी भारतीय-ब्रिटीश अभिनेते देव पटेलला सन्मानित करण्यात आले आहे. देव पटेलने “मंकी मॅन”चे दिग्दर्शन करून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे.
-
शैक्षणिक क्षेत्रातील येल विद्यापीठाची प्राध्यापिका प्रियंवदा नटराजन यांना खगोलशास्त्रातील आपल्या विशेष संशोधनासाठी टाइम मॅगझीनद्वारे गौरवण्यात आले आहे.
-
भारतीय-ब्रिटीश रेस्टॉरेंटर अस्मा खानला तिच्या लंडनच्या प्रसिद्ध रेस्टॉरंट ‘दार्जिलिंग एक्स्प्रेस’मध्ये आपल्या पाककलेचा आणि पाककृतीच्या नाविन्यपूर्ण प्रयत्नांसाठी सन्मानित करण्यात आले. तिचा पाककलेचा प्रवास हा भारतीय संस्कृती, परंपरा आणि नावीन्यपूर्णतेचा आहे.
-
यूएस डिपार्टमेंट ऑफ एनर्जीच्या लोन प्रोग्रामचे संचालक जिगर शाह यांना जागतिक स्तरावर आर्थिक विकास उपक्रमांचे नेतृत्व करण्यासाठी सन्मानित करण्यात आले आहे.
(all photo credits: Indian express)

ऐश्वर्या नारकरांचा मुलगा भारतात परतला! एअरपोर्टवर गर्लफ्रेंडने ‘असं’ केलं स्वागत, ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत करते काम