-
उन्हाळ्याच्या सुट्टीत सहलीला जाण्याचा विचार करत असाल तर उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे तुम्ही थंड-गार हिल स्टेशनला भेट देऊ शकता. जाणून घेऊया गुजरातमधील एका खास हिल स्टेशनबद्दल जे उन्हाळ्याच्या उष्णतेपासून तुम्हाला थंडावा देईल.
-
‘पालिताना’ हे भावनगरपासून ५१ किमी अंतरावर वसलेले शहर आहे. पालीताणामध्ये शहरामध्ये शत्रुंजय नावाची टेकडीवर देखील आहे. या पवित्र ठिकाणी एकूण ८६३ मंदिरे आहेत.
-
कार्तिक पौर्णिमेदरम्यान अनेक यात्रेकरूं ‘घोडापूर’ येथे दर्शनासाठी आवर्जून येतात.
-
पालिताना हे थंड निसर्गरम्य हिल स्टेशन आहे जे जैन धर्माच्या पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. शत्रुंजय ही मंदिरांनी भरलेली एक अद्भुत टेकडी आहे, जी 900 वर्षांपूर्वी बांधली गेली होती.
-
पालितानामधील शत्रुंजय या हिल स्टेशनवरील ही मंदिरे ११ व्या शतकाच्या कालावधीत बांधली गेली आहेत, निसर्गरम्य वतावरणासह ही मंदिरे एक वेगळे आध्यात्मिक अनुभव ही देतात.
-
तुम्ही पालीताना शहरात तुमच्या बजेटनुसार हॉटेल्स बूक करू शकता.
-
पालिताना या हिल स्टेशनला भेट देताना कोणत्या ही प्रकारचे खाद्य-पदार्थ नेण्याची परवानगी नाही, पण डोंगराच्या पायथ्याशी तुमच्या सोयीसाठी अनेक फूड स्टॉल आहेत.

बापरे! तरुण ११० च्या स्पीडला बुलेट पळवत होता; अचानक ब्रेक मारला अन्… क्षणार्धात घडला भयंकर अपघात, लाईव्ह VIDEO व्हायरल