-
भारतात अनेक पर्यटन स्थळ आहेत जिथे पर्यटक सहलीसोबत ट्रेकिंग, रायडिंग आणि पॅराग्लायडिंगसारख्या अनेक गोष्टींचा आनंद घेऊ शकतात. जाणून घेऊया उन्हाळ्यात ट्रेकिंगसाठी भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांबद्दल.
-
हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील ‘बीर बिलिंग’ हे एक प्रसिद्ध पर्यटक ठिकाण आहे. हे ठिकाण एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. उंच पर्वतांमुळे बीर बालिंग हे पॅराग्लायडिंगसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. म्हणूनच बीर बिलिंगला भारताची पॅराग्लायडिंग राजधानी देखील म्हटली जाते. (फोटो – सोशल मीडिया) -
उत्तराखंडमधील ऋषिकेश हे धार्मिक पर्यटन स्थळ असले तरी ते आपल्या एडवेंचरसाठी ही प्रसिद्ध आहे. अनेकक पर्यटक इथे गंगा नदीच्या काठावर ऋषिकेशमध्ये रिव्हर गंगा राफ्टिंग, रॉक आणि क्लिफ क्लाइंबिंगसाठी येतात. (फोटो – सोशल मीडिया) -
जम्मू काश्मीरमधील लडाक हे त्याच्या अद्वितीय भौगोलिक रचनेमुळे जगभर प्रसिद्ध आहे. उंच पर्वत, खोल दऱ्या, वाहत्या नद्या आणि स्वच्छ आकाश यामुळे लडाख हे ट्रेकिंग आणि राफ्टिंगसाठी एक योग्य ठिकाण आहे. (फोटो – सोशल मीडिया)
-
मनाली हे हिमाचल प्रदेशातील एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. अनेक पर्यटक मनालीच्या पर्वत आणि दऱ्यांमध्ये ट्रेकिंगचा आनंद घेतात. तुम्ही याशिवाय इथे बाईक रायडिंग ही एन्जॉय करू शकता.(फोटो – सोशल मीडिया)
-
ओली हे उत्तराखंडमधील हिल स्टेशन उंचावर असल्यामुळे इथे सर्पिल उतार, मनमोहक वातावरण आणि डोंगराच्या माथ्यावरून दिसणारे सुंदर दृश्य आहे जे ट्रेक करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. (फोटो – सोशल मीडिया)
-
गुलमर्ग हे जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे निसर्गरम्य ठिकाण पर्यटकांना स्वित्झलँडचा अनुभव देते. हे पर्यटक स्थान ट्रेकिंगसाठी ही प्रसिद्ध आहे. (फोटो – सोशल मीडिया)
-
उत्तराखंडचे निसर्गसौंदर्य आणि थंड वातावरण अनुभवण्यासाठी येथे अनेक पर्यटक ट्रेकिंगसाठी येतात. (फोटो – सोशल मीडिया)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली