1 'Tata Ultrod Racer' भारतात लॉन्च झाली आहे. टाटा कंपनीची ही कार तुम्हाला प्रिमियम लूक देते. टाटाने या कारला तीन पर्याय सह लाँच केले आहे. या नवीन 'Tata Altroz Racer' ची किंमत 10 लाखांपेक्षा कमी आहे आणि फक्त 21,000 रुपयांच्या टोकनवर तुम्ही ही कार बुक करू शकता. टाटा अल्ट्रोझ रेसर त्याच्या स्पोर्टी एक्सटीरियर, इंटीरियर आणि टर्बो पॉवरमुळे इतर कार पेक्षा वेगळी आहे. ७ जून ला कंपनीने कार विक्रीसाठी लाँच केली आहे. टाटा अल्ट्रोझ रेसरमध्ये आर १६ अलॉय व्हील्स, वायर असिस्टसह इलेक्ट्रिक सनरूफ, कनेक्टेड कार टेक, ६ एअरबॅग्ज, ३६० डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जर, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, लेदर सीट्स आणि डिजिटल क्लस्टर अशा फीचरने सुसज्ज आहे. या कारमध्ये तुम्हाला स्टीयरिंग माउंटेड क्लस्टर कंट्रोल, वायरलेस एए आणि एसीपी एक्सप्रेस कूलर देण्यात आले आहे. कारमध्ये १.२ लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे, १२० पीएसचे पॉवर देते. ही कार ६ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनने देखील सुसज्ज आहे. टाटाची ही कार 'आर १ ', 'आर २ ' आणि आर ३ या पर्यायासह उपलब्ध आहे. 'Tata Altroz Racer'ची शोरूम किंमत रु ९.४९ लाखांपासून ते ११ लाख पर्यंत आहे. (सर्व फोटो : टाटा मोटर्स कार अधिकृत अकाऊंट)