-
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० विश्वचषक सामन्यासाठी सारा तेंडुलकर तिचे वडील सचिन तेंडुलकर आणि आई अंजली यांच्यासह अमेरिकेत पोहोचली होती. येथे ती न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसली.
-
आता सचिनचे कुटुंब भारतात परतले असून साराने परत येऊन हृदय जिंकणारे काम केले आहे. अलीकडेच साराने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती लहान मुलांना शिकवताना दिसत आहे.
-
साराने पोस्ट केलेले हे फोटो मध्यप्रदेशातील सेहोर येथील असून सचिनचे संपूर्ण कुटुंब ‘सचिन तेंडुलकर फाउंडेशन’साठी एकत्र काम करतात.
-
समाजसेवेअंतर्गत हे फाउंडेशन देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या उद्देशाने काम करत आहे. सचिन व्यतिरिक्त त्याची पत्नी अंजली, मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन हे देखील आपला अमूल्य वेळ काढून समाजसेवेत गुंततात.
-
या फोटोंमध्ये सारा आणि तिची आई अंजली मुलांना शिकवताना दिसत आहे. यादरम्यान दोघांनीही मुलांशी संवाद साधला. अंजलीनेही यातील एका मुलाला आपल्या मांडीवर घेऊन त्याला मिठी मारली. यादरम्यान सारा सूट सलवारमध्ये खूपच क्यूट दिसत होती.
-
साराने तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “मला माझ्या आयुष्यातील केवळ पहिलेच वर्ष माझ्या आजोबांसोबत घालवण्याची संधी मिळाली, परंतु मी त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या शिक्षणाबद्दलच्या अनेक गोष्टी ऐकून मोठी झाले.”
-
सारा पुढे म्हणाली, “एक प्राध्यापक म्हणून त्यांचा असा विश्वास होता की शिक्षणामध्ये अमर्याद संधींची दारे उघडण्याची शक्ती आहे. मध्य प्रदेशातील सेहोर जिल्ह्यातील सेवा कुटीरला भेट दिल्याने मला त्याचा अर्थ काय आहे हे समजण्यास मदत झाली.”
-
ती पुढे म्हणाली, “शिक्षणाव्यतिरिक्त, STF द्वारे सेवा कुटीर मुलांना दिवसातून दोनवेळा पौष्टिक जेवण देतात आणि स्थानिक समुदायासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करतात. STF चा भाग असल्याचा मला अभिमान आहे.”
-
सचिन तेंडुलकर फाऊंडेशनने सिहोर जिल्ह्यातील नयापुरा, खापा, बेलपाटी, जामुंझील आणि सेवानिया कॉटेज दत्तक घेतले आहेत. या कॉटेजमध्ये 3 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षण, भोजन आणि इतर सुविधा पुरविल्या जातात. (फोटो स्रोत: @sachintendulkarfoundation/instagram)

“कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल