-
१५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त चित्रपटगृहांमध्ये बॉलीवूडसह दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. जाणून घेऊया बॉक्स ऑफिसवर धमाल रंगावणाऱ्या या चित्रपटांबद्दल.
-
दक्षिण चित्रपटसृष्टीतील स्टार कलाकारांपैकी एक असलेल्या चियान विक्रमचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘थंगालन’ १५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
-
जॉन अब्राहमचा आगामी चित्रपट ‘वेदा’ १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
-
राजकुमार राव, पंकज त्रिपाठी आणि श्रद्धा कपूर यांचा चित्रपट ‘स्त्री-२’ देखील स्वातंत्र्य दिनानिमित्त चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.
-
दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेशचा ‘रघु थाथी’ हा चित्रपटही १५ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा एक कॉमेडी चित्रपट आहे.
-
संजय दत्त यांचा दाक्षिणात्य चित्रपट ‘डबल इस्मार्ट’ देखील १५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
-
साऊथ सिनेसृष्टीतील स्टार अभिनेत्यांपैकी एक रवी तेजा यांचा ‘मिस्टर बच्चन’ हा चित्रपटही १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
-
अक्षय कुमार, फरदीन खान आणि तापसी पन्नू यांचा ‘खेल खेल में’ हा चित्रपट स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

“आता मरण आलं तरीही…”; २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला…