-
आजकाल सोशल मीडिया खूप महत्त्वाचा आहे आणि इंस्टाग्राम हे जगातील सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. इंस्टाग्रामचा वापर केवळ युवा पिढीच नाही तर सेलिब्रिटी, व्यावसायिक आणि विविध क्षेत्रातील लोक देखील करतात. Data Reportal या जागतिक स्तरावर सोशल मीडियाची आकडेवारी काढणाऱ्या साइटनुसार, दर महिन्याला दोन अब्ज लोक Instagram ॲपवर सक्रिय असतात.
-
भारत
इंस्टाग्रामच्या सर्वाधिक वापरकर्त्यांसह भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारतात इंस्टाग्रामचे ३८५.३५ दशलक्ष वापरकर्ते आहेत. -
युनायटेड स्टेट्स
अमेरिका दुसऱ्या स्थानावर आहे, जिथे १६६.१५ दशलक्ष लोक इंस्टाग्राम वापरतात. -
ब्राझील
ब्राझील तिसऱ्या स्थानावर आहे, जिथे १३५.०५ दशलक्ष लोक इंस्टाग्रामशी जोडलेले आहेत. -
इंडोनेशिया
९९.०४ दशलक्ष वापरकर्त्यांसह इंडोनेशिया चौथ्या स्थानावर आहे. -
तुर्की
पाचव्या स्थानावर तुर्की हा देश आहे, जिथे ५८.४५ दशलक्ष लोक इंस्टाग्राम वापरतात. -
जपान
५५.०५ दशलक्ष वापरकर्त्यांसह जपान सहाव्या क्रमांकावर आहे. -
मेक्सिको
मेक्सिको सातव्या स्थानावर असून ४६.०७ दशलक्ष लोक इन्स्टाग्रामशी जोडलेले आहेत. -
जर्मनी
जर्मनी आठव्या स्थानावर आहे, जिथे ३२.८५ दशलक्ष लोक इंस्टाग्राम वापरतात. -
युनायटेड किंगडम
युनायटेड किंगडम या यादीत नवव्या स्थानावर आहे, येथे ३१.०९ दशलक्ष लोक इंस्टाग्रामशी जोडलेले आहेत. -
इटली
इटली दहाव्या स्थानावर आहे, जिथे २८.४५ दशलक्ष लोक इंस्टाग्राम वापरतात.
(Photos Source: Pexels)

शनी महाराज निघाले चांदीच्या पावलांनी; ‘या’ राशींमध्ये होणार उलाढाली! वर्षभर शनिदेव देणार पैसाच पैसा, मिळू शकते मोठं सरप्राईज