-
जोनाथन हा सेशेल्सचा विशाल कासव आहे, जो जगातील सर्वात जुना जिवंत प्राणी आहे. जगातील सर्वात जुना प्राणी म्हणून जोनाथनचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. (Photo: @jonathanthetortoise/instagram)
-
त्याचा जन्म १८३२ मध्ये झाला होता आणि २०२४ मध्ये तो १९२ वर्षांचा होणार आहे. जोनाथन दक्षिण अटलांटिक महासागरात स्थित ब्रिटिश ओव्हरसीज टेरिटरीमधील सेंट हेलेना बेटावर राहतो. (Photo: @jonathanthetortoise/instagram)
-
जोनाथनला १८८२ मध्ये सेशेल्समधून सेंट हेलेना येथे आणण्यात आले, तेव्हा तो ५० वर्षांचा होता. त्यावेळी त्यास गव्हर्नर सर विल्यम ग्रे-विल्सन यांना भेट म्हणून देण्यात आले होते. (Photo: @jonathanthetortoise/instagram)
-
या कासवाने आपल्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना पाहिल्या आहेत, जसे की पहिले आणि दुसरे महायुद्ध, आणि त्याने सात ब्रिटीश सम्राट आणि ३९ अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पाहिले आहे. (Photo: @jonathanthetortoise/instagram)
-
मात्र, मोतीबिंदूमुळे जोनाथन आंधळा झाला असून त्याची वासाची जाणीवही हरवली आहे. इतके वय झालेले असूनही, जोनाथन सक्रिय आहे आणि तो त्याच्या घेरात हळू हळू चालतो. (Photo Source: @guinnessworldrecords/instagram)
-
जोनाथन त्याच्या वयाशी संबंधित अंधत्वामुळे गवत चरू शकत नाही. त्यामुळे त्याला गाजर, कोशिंबिर पाला, काकडी अशा फळे आणि भाज्यांचा विशेष आहार दिला जातो.
-
जोनाथनचे बहुतेक आयुष्य गव्हर्नरच्या घरात गेले आहे, जिथे त्याने इतर अनेक कासवांसोबत वेळ घालवला आहे. १८८२ ते १८८६ दरम्यान घेतलेल्या जुन्या छायाचित्रांमधून जोनाथनचे वय लक्षात येते. (Photo Source: @guinnessworldrecords/instagram)
-
२०२२ मध्ये सर्वात जुने जिवंत प्राणी म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डद्वारे अधिकृतपणे त्याची नांदणी केली गेली. तेव्हापासून आजतागायत या कासवाचा विक्रम अबाधित आहे. (Photo: @jonathanthetortoise/instagram)

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”