-
यंदा शारदीय नवरात्री ३ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे.
-
नवरात्रीच्या नऊ दिवसांत माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. पण, तुम्हाला माहीत आहे का की, कलशाची प्रतिष्ठापना का केली जाते आणि त्याचे महत्त्व काय आहे. यासोबतच कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
-
पौराणिक मान्यतेनुसार कलशाच्या मुखात भगवान विष्णू, कंठात महादेव आणि मुळात ब्रह्मदेव विराजमान आहेत. कलशाच्या मध्यभागात दैवी मातृ शक्तीचा वास असतो. कलश हे दुर्गामातेच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते. हे सकारात्मक ऊर्जेचेदेखील प्रतीक आहे; जे घरात शांती आणि समृद्धी आणते.
-
कलशाची प्रतिष्ठापना करताना नेहमी सोने, चांदी, तांबे किंवा मातीपासून बनविलेले कलश वापरावेत, असे मानले जाते. त्यासोबतच प्रतिष्ठापनेदरम्यान दिशेलाही विशेष महत्त्व आहे.
-
मान्यतेनुसार, कलशाची प्रतिष्ठापना करताना चुकूनही लोखंडी कलश वापरू नये.
-
कलशाच्या स्थापनेत वेळ आणि दिशा यांचेही खूप महत्त्व आहे. या वेळी कलशाच्या प्रतिष्ठापनेसाठी दोन शुभ मुहूर्त आहेत. पहिली शुभ वेळ सकाळी ६:१५ ते ७:२२ पर्यंत आहे. त्याशिवाय दुसरा मुहूर्त सकाळी ११:४६ ते दुपारी १२:३३ पर्यंत आहे. कलशाची प्रतिष्ठापना नेहमी उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला करावी.
-
कलशाची प्रतिष्ठापना करताना तांदूळ, गहू, मूग, हरभरा, नाणी, पाने, गंगाजल व कुंकू टाकून त्यावर नारळ ठेवला जातो.
-
मान्यतेनुसार ज्या घरात कलश प्रतिष्ठापित केला जातो, त्या घरात कधीही आर्थिक समस्या येत नाहीत.
-
धार्मिक मान्यतेनुसार, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची प्रतिष्ठापना केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि भक्तांना दुर्गामातेचा आशीर्वादही मिळतो.

डोक्यातील निगेटिव्ह विचारांमुळे रात्री झोपच लागत नाही? फक्त ५ उपाय; शांत लागेल झोप