-
सध्याच्या काळात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. फोन हॅक करण्यापासून ते बँक खात्यातून पैसे काढण्यापर्यंत लाखो प्रकरणे समोर येत आहेत. यासोबतच सायबर गुन्हेगार तुमची ओळख चोरून आपली फसवणूक करतात. सायबर गुन्हेगार तुमचा फोन नंबर कसा चोरतात?, फसवणूक टाळण्यासाठी कोणत्या गोष्टींबद्दल सतर्क असले पाहिजे? ते जाणून घेऊ. (फोटो: पेक्सेल्स)
-
लिंकवर क्लिक करू नका
सायबर गुन्हेगार बऱ्याचदा खरे वाटणारे बनावट संदेश आणि ईमेल लोकांना पाठवतात. या मेसेजमध्ये काही लिंक्स असतात आणि तुम्ही त्या लिंकवर क्लिक करताच तुमचा फोन नंबर आणि इतर अनेक माहिती सायबर गुन्हेगार चोरतात. त्यामुळे अशावेळी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. (फोटो: पेक्सेल्स) -
बनावट ऑफर
याशिवाय अनेक वेळा सायबर गुन्हेगार तुम्हाला खोट्या ऑफरचे आमिष दाखवतात ज्यामध्ये ते तुमचा फोन नंबर आणि पत्ता विचारतात. माहिती शेअर करताच सायबर गुन्हेगार त्यांचे काम साधून घेतात. (फोटो: पेक्सेल्स) -
सोशल मीडिया धोकादायक आहे
आजकाल अनेकांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक होताना दिसत आहेत. सायबर गुन्हेगार सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तुमचा नंबर चोरू शकतात. वास्तविक, अनेक वेळा आपण आपला नंबर सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये टाकतो जो सायबर गुन्हेगारांना सहज दिसू शकतो आणि इथे तुमची फसवणूक होऊ शकते. अशा वेळी गोपनियता सेटींग्स तपासा. (फोटो: पेक्सेल्स) -
बनावट कॉल
अनेक वेळा सायबर गुन्हेगार कंपनीच्या नावाने बनावट कॉल करतात. सर्वेक्षणाचे कारण सांगून ते तुमच्याकडून फोन नंबर, पत्ता व इतर माहिती घेऊ शकतात, अशावेळी तुम्ही जास्त सतर्क राहा. (फोटो: पेक्सेल्स) -
वाय-फाय
सायबर गुन्हेगार सार्वजनिक वाय-फायद्वारे तुमचा फोन ट्रॅक करू शकतात. नंबरसोबतच इतर गुप्तचर माहितीही चोरली जाऊ शकते. त्यामुळे अनोळखी व्यक्तींना वायफाय कधीच देऊ नका. (फोटो: पेक्सेल्स) -
ॲप फसवणूक
असे अनेक ॲप्स आहेत जे डाऊनलोड केल्यानंतर आणि परवानगी दिल्यानंतर केवळ तुमचा नंबरच नाही तर सर्व संपर्क क्रमांक आणि इतर माहितीही चोरुन घेऊ शकतात. त्यामुळे फोनमध्ये संशयास्पद ॲप्स असल्यास ते त्वरित डिलीट करा. (फोटो: पेक्सेल्स)

“अमिताभ बच्चन व राजेश खन्नांच्या शत्रुत्वामुळे माझे वडील दारूच्या आहारी गेले”, बॉलीवूड अभिनेत्याचे वक्तव्य