-
Shukra Gochar 2025 : ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला वैभव आणि सौंदर्याचा स्वामी मानले जाते. शुक्र ठरावीक काळानंतर राशी बदलतो; ज्यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या प्रभाव पडतो. शुक्र २६ दिवसांनी आपली राशी बदलतो.
-
अशा परिस्थितीत शुक्र एका राशीत सुमारे एक वर्ष असतो. त्यात २०२५ हे वर्ष लवकरच सुरू होणार आहे. या नवीन वर्षात शुक्र अनेक राशींमध्ये प्रवेश करील. त्याचप्रमाणे वर्षाच्या सुरुवातीला शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे; ज्यामुळे मालव्य नावाचा राजयोग तयार होईल.
-
शुक्राच्या राशीतील बदलामुळे १२ राशींच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होणार आहे. त्यापैकी अशा तीन राशी आहेत की, ज्यांना सर्वाधिक लाभ मिळू शकतो.
-
द्रिक पंचांगानुसार, शुक्र २८ जानेवारीला सकाळी ७ वाजून १२ मिनिटांनी मीन राशीत प्रवेश करील. ३१ मे २०२५ पर्यंत शुक्र या राशीत राहील.
-
शुक्र मीन राशीत प्रवेश करीत असल्यामुळे कोणत्या तीन राशींच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीत विशेष लाभ मिळू शकतो, जाणून घेऊ…
-
वृषभ : शुक्राचा मीन राशीतील प्रवेश वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात वृषभ राशीच्या लोकांच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. त्यासह नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही शुक्राचा विशेष आशीर्वाद मिळू शकतो.
-
तुम्ही मित्रांसह चांगला वेळ घालवू शकाल. तुम्हाला भाऊ-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. तसेच सुख-सुविधा वाढू शकतात. आरोग्याची विशेष काळजी घ्या. कुटुंबाबरोबर चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकतात.
-
मिथुन : शुक्राचे मीन राशीत प्रवेश करणे मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते.
-
मोठ्या आर्थिक लाभासह नोकरी आणि व्यवसायात अपार यश मिळू शकते. विचारातील सर्जनशीलता लक्षणीय प्रमाणात वाढू शकते.त्यासह तुमचे काम पाहून वरिष्ठ अधिकारी आणि बॉस तुमची प्रशंसा करू शकतात.
-
या काळात तुम्हाला परदेशात करिअरसाठी उत्तम संधी मिळू शकतात. आयात-निर्यात व्यवसायात भरपूर नफा कमावता येऊ शकतो. एकंदरीत शुक्राचे मीन राशीतील परिवर्तन नोकरदार लोकांसाठी चांगले सिद्ध होऊ शकते.
-
कन्या : शुक्राचे राशी परिवर्तन कन्या राशीच्या लोकांना फलदायी ठरू शकते. या काळात तुम्ही आनंदी राहाल, तसेच आपुलकी टिकवून ठेवू शकता. या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते.
-
आर्थिक स्थिती चांगली राहील. या काळात तुम्हाला गुरू आणि वडिलांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. तसेच व्यवसायात नफा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. (photo – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”