-
इस्त्रायल आणि इराण या दोन देशांमध्ये प्रादेशिक तणाव कमालीचा वाढला आहे. यादरम्यान इस्त्रायलने पुन्हा एकदा इराणवर हवाई हल्ले सुरु केले आहेत. या दोन्ही देशांतील संघर्षाचा आजचा पाचवा दिवस आहे. जाणून घेऊयात काही महत्वाच्या अपडेट्स… (Photo: AP)
-
१. शुक्रवारपासून इराणमध्ये २२४ लोकांचा मृत्यू झाला आहे, असे सरकारने म्हटले आहे, त्यांनी म्हटले आहे की मृतांमधले बहुतेक नागरिक हे स्थानिकच होते. (Photo: AP)
-
२. तर दुसरीकडे इस्रायलच्या आपत्कालीन सेवांनी सांगितले की, इराणच्या हल्ल्यात २४ जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे ४०० जण जखमी झाले आहेत. (Photo: AP)
-
३. इस्रायलने इराणमधील तेहरान आणि बुशेहरमधील तेल डेपो आणि गॅस रिफायनरीजसह अनेक ठिकाणी हल्ले केले आहेत. (Photo: AP)
-
४. इस्रायलसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने इराणला बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे विकण्यास नकार दिला आहे. इस्लामाबाद शहराला लागून असलेल्या राज्यांच्या सीमाही बंद केल्या आहेत. (Photo: AP)
-
कशी झाली होती सुरूवात?
५. इस्रायलने ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ सुरू केले, त्यातून २०० लढाऊ विमानांनी इराणवर हल्ला केला. या कारवाईत ९ इराणी शास्त्रज्ञ आणि २० हून अधिक लष्करी कमांडर मारले गेले. (Photo: AP) -
६. इराणने प्रत्युत्तर देत ‘ट्रू प्रॉमिस थ्री’ या नावाने मोहिम राबवली आणि १५० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. इराणने इस्रायली संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावाही केला. (Photo: AP)
-
७. नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदींशी बोलून परिस्थितीची माहिरइदिली. इराणने अणु करारावर स्वाक्षरी करावी अन्यथा मोठा हल्ला होईल, अशी भूमिका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडली. (Photo: AP)
-
८. इस्रायली राष्ट्राध्यक्षांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. इराणने तीन इस्रायली एफ-३५ विमाने पाडल्याचाही दावा केला. (Photo: AP)
-
९. इस्रायलमध्ये ५ जणांचा मृत्यू. ७ सैनिकांसह १३० हून अधिक लोक जखमी. (Photo: AP)
-
१०. इराण आणि अमेरिका यांच्यातील अणु चर्चा रद्द करण्यात आली. (Photo: AP) हेही पाहा- PM Modi Canada Visit G7 Summit 2025: जी-७ शिखर परिषदेसाठी पीएम मोदी कॅनडामध्ये दाखल; पंतप्रधानांच्या ‘या’ दौऱ्याचे महत्व काय?
IND vs PAK: ICC ची हारिस रौफ-फरहानवर मोठी कारवाई, भारत-पाक फायनलपूर्वी बसला मोठा धक्का