-
इस्रायल आणि इराण एकमेकांना जास्तीत जास्त नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, इस्रायलने इराणवर एक मोठा आरोप केला आहे. इस्रायलने म्हटले आहे की इराणने त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी क्लस्टर बॉम्बचा वापर केला आहे. हे बॉम्ब सामान्य नागरिकांना अत्यंत गंभीर इजा पोहोचवण्यासाठी ओळखले जातात. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य- Pexels)
-
क्लस्टर बॉम्ब आणि अणुबॉम्ब
क्लस्टर बॉम्ब आणि अणुबॉम्ब दोन्हीही विनाशकारी शस्त्रे आहेत, पण क्लस्टर बॉम्ब अणुबॉम्बपेक्षा जास्त धोकादायक आहे का? चला त्यांच्या धोक्यांबद्दल जाणून घेऊया. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य- Pexels) -
क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय?
क्लस्टर बॉम्ब हे एक प्रकारचे शस्त्र आहे, ज्यामधून अनेक लहान बॉम्ब किंवा ‘सबम्युनिशन्स (submunitions)’ विस्तृत भागावर टाकले जातात. एकदाच स्फोट होण्याऐवजी हा बॉम्ब हवेत असतानाच उघडतो आणि विसृत भागात विखुरन अनेक लहान-लहान स्फोट घडवून आणतो. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य- Pexels) -
अणुबॉम्ब म्हणजे काय?
अणुबॉम्ब विखंडन (nuclear fission) किंवा संलयन (nuclear fusion) प्रक्रियेद्वारे प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण करतात. ते एकाच स्फोटात शहर नष्ट करू शकतात. अणुबॉम्बचा स्फोटामुळे मोठी जीवितहानी आणि मोठ्या प्रमाणावर विध्वंस होऊ शकतो. त्याचे किरणोत्सर्ग बराच काळ प्रभावी राहतात. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य- Pexels) -
क्लस्टर बॉम्बचा धोका
क्लस्टर बॉम्बमुळे हल्ल्यादरम्यान आणि त्यानंतरही ते नागरिकांना धोका निर्माण करतात ज्यामुळे त्यातून नागरिकांसाठी धोका निर्माण होतो. हे बॉम्ब अनेक दशके सक्रिय राहू शकतात. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य- Pexels) -
अणुबॉम्बचा परिणाम
अणुबॉम्बचा स्फोट लाखो लोकांचा तात्काळ मृत्यू होऊ शकतो आणि त्याच्या किरणोत्सर्गी परिणामांचा पर्यावरण आणि आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होतो. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य- Pexels) -
विनाशाची व्याप्ती
क्लस्टर बॉम्बमुळे मोठ्या भागात पसरणारे छोटे स्फोट होतात, तर अणुबॉम्बमुळे एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात विनाश होतो. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य- Pexels) -
संघर्षानंतरही धोका
स्फोट न झालेले क्लस्टर बॉम्ब संघर्ष संपल्यानंतर बरेच दिवस नागरिक आणि अनपेक्षित लक्ष्यांना ठार मारू शकतात किंवा त्यांना अपंग करू शकतात आणि ते शोधून काढणेही महाग आहे. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य- Pexels) -
अणुबॉम्ब त्यांच्या तात्काळ विनाशात अधिक धोकादायक असतात, तर क्लस्टर बॉम्ब नागरिकांसाठी दीर्घकाळ धोका निर्माण करतात. अणुबॉम्बच्या तुलनेत क्लस्टर बॉम्बचा प्रभाव मर्यादित असतो. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य- Pexels) हेही पाहा: एआयच्या युगात जर तुम्ही ‘ही’ ८ कौशल्य शिकलात तर तुम्हाला देश-विदेशात मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांची संधी आहे…

“जास्त गर्व करू नये कारण…पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा”; मृत्यूपूर्वी वाघीणीचा शेवटचा VIDEO; फोटोग्राफरही रडला