-
श्रावण महिना हा महादेवाच्या उपासनेसाठी सर्वोत्तम मानला जातो. यंदा २५ जुलैपासून श्रावणाची सुरूवात होत आहे. (Photo: AI)
-
देवांचा देव अशी ख्याती असलेल्या महादेवाची मंदिरं भारतासह जगभर आढळतात, आज आपण पाकिस्तानातील २ महादेव मंदिरांबद्दल जाणून घेऊयात जे त्यांच्या इतिहास व आख्यायिकांसाठी खूप प्रसिद्ध आहेत. (Photo: AI)
-
कटासराज मंदिर, चकवाल
पाकिस्तानमध्ये कटासराज नावाचे एक मंदिर आहे, जिथे महादेवाचे अश्रू पडले होते असे मानले जाते. हे मंदिर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील चकवाल जिल्ह्यामध्ये आहे. (Photo: X) -
पौराणिक मान्यता
कटासराज मंदिराबद्दल असे मानले जाते की जेव्हा माता सतीने स्वतःला अग्निच्या हवाली केले होते तेव्हा सतीच्या वियोगात महादेवाने येथे अश्रू ढाळले. (Photo: X) -
त्यांच्या त्या अश्रूंपासून एक तलाव तयार झाला, ज्याला कटक्ष कुंड म्हटले जाऊ लागले आणि आता त्या तलावाला खूप पवित्र मानले जाते. कटक्ष कुंडावरून या मंदिराचे नाव कटासराज असे झाले. (Photo: X)
-
कटासराज मंदिराचा इतिहास
हे मंदिर महाभारत काळात बांधले गेले असल्याचे देखील सांगितले जाते. पांडवांनी त्यांच्या वनवासाचा काही काळ या मंदिरात घालवला होता असेही म्हटले जाते. मंदिराच्या आजूबाजूला इतर अनेक लहान लहान मंदिरं आहेत, जी १० व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. (Photo: X) -
श्री रत्नेश्वर महादेव मंदिर, कराची
हे पाकिस्तानातील कराची येथील एक ऐतिहासिक महादेव मंदिर आहे. (Photo: X) -
हे मंदिर शिवरात्री उत्सवासाठी प्रसिद्ध आहे, आणि या उत्सवादरम्यान मंदिराला २५,००० भाविक भेट देतात. (Photo: X)
-
या मंदिराबद्दल अशी आख्यायिका आहे की महादेवाचा तिसरा डोळा समुद्रावर लक्ष ठेवतो आणि पूरासारख्या आपत्तींपासून लोकांचे रक्षण करतो. (Photo: X)
-
श्री रत्नेश्वर महादेव मंदिराच्या गाभाऱ्यातील आणखी एक फोटो. (Photo: X) हेही पाहा- ‘तारक मेहता….’मधील जेठालालने ४५ दिवसांमध्ये १६ किलो वजन केलेलं कमी; हे कसं शक्य झालं? जाणून घ्या…

San Rechal : प्रसिद्ध मॉडेल सॅन रेचेलची आत्महत्या, आर्थिक कारणांमुळे टोकाचं पाऊल उचलल्याची पोलिसांची माहिती