-
मुकेश अंबानी जे काही करतात ते मोठ्या तयारीने उतरून करतात. मग ते जिओ टेलिकॉम इंडस्ट्री असो किंवा त्यांच्या मुलाचं लग्न असो.
-
मुकेश अंबानी आता पुन्हा एकदा जिओ आयपीओद्वारे असेच काही करण्याची तयारी करत आहेत.
-
मुकेश अंबानी जिओ इन्फोकॉमचा आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत. हा आयपीओ पुढील येऊ शकतो. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ असू शकतो.
-
अहवालांनुसार, मुकेश अंबानी ६ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ५२ हजार कोटी रुपयांचा आयपीओ आणण्याची तयारी करत आहेत. जर असे झाले तर ते इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ असेल. आतापर्यंत ह्युंदाई मोटर्सचा २७ हजार कोटी रुपयांचा आयपीओ हा सर्वात मोठा आयपीओ आहे.
-
जिओ आयपीओ अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची आयपीओबाबत सेबीशी चर्चा सुरू आहे. सेबीच्या मंजुरीसाठी रिलायन्सला प्रथम त्यांची कागदपत्रे सेबीकडे सादर करावी लागतील. सेबीची मंजुरी मिळाल्यानंतरच जिओ आयपीओचा मार्ग स्पष्ट होणार आहे.
-
जिओ इन्फोकॉम लिमिटेड ही रिलायन्सच्या प्रमुख कंपन्यांपैकी एक आहे. जिओ ही भारतातील टेलिकॉम क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय कंपनी आहे. २०१६ मध्ये जेव्हा रिलायन्सने जिओ लाँच केले तेव्हा त्यांनी संपूर्ण देशात मोफत इंटरनेट आणि मोफत कॉलिंग दिले होते.
-
कंपनीने वापरकर्त्यांना बराच काळ मोफत टेलिकॉम सेवा पुरवल्या. भारतातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरात इंटरनेट पुरवण्याचे मोठे श्रेय जिओला दिले जाते. तथापि, जिओच्या मोफत ऑफरचा इतर टेलिकॉम कंपन्यांना मोठा फटका बसला होता.
-
जिओ इन्फोकॉमचा प्राथमिक व्यवसाय टेलिकॉम आणि इंटरनेट सेवा प्रदान करणे आहे. याबरोबरच, जिओ इन्फोकॉमने जिओची एक संपूर्ण इकोसिस्टम तयार केली आहे, ज्यामध्ये ग्राहकांना टीव्ही, संगीत, बिझनेस, बातम्या, जिओ क्लाउड अशा सुमारे ४० सुविधा पुरवल्या जातात
-
(सर्व फोटो साभार- मेटा एआय) हेही पाहा- Photos :”…आणि पुन्हा एकदा मराठी असल्याचा अभिमान वाटला”; प्रियदर्शिनी इंदलकरची व्हिएतनाम सफर, कॅप्शनने वेधलं लक्ष!

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक