-
आज तुमच्यासाठी डोळ्यांच्या तीक्ष्ण नजरेची खरी कसोटी घेणारं एक भन्नाट चॅलेंज घेऊन आलो आहोत.
-
सोशल मीडियावर सध्या एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि त्यातून विचारला गेलेला प्रश्न कुणालाही सहज सोडवता येणारा नाही.
-
या फोटोमध्ये एक मांजर अत्यंत शिताफीने लपून बसली आहे; पण ती मांजर शोधताना तुमचे डोळे आणि मेंदू यांची जुगलबंदी होणार आहे.
-
दिसायला अगदी सामान्य वाटणाऱ्या या चित्रात एक चलाख मांजर इतक्या हुशारीनं लपून बसलीय की, ९९% लोकांच्या डोळ्यांना ती सापडतच नाही.
-
काही जणांनी तर चष्मा तीन-तीन वेळा पुसून पाहिलं, काहींनी फोटो झूम करून स्कॅन केला; पण त्यांना उत्तर मिळालं नाही.
-
अनेकांनी दावा केला आहे की, त्यांना ही मांजर शोधायला पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला, तर काहींनी सांगितलं की, त्यांनी तीन सेकंदांतच ती लपलेलं ठिकाण ओळखलं.
-
काही जण म्हणतात की, जर फोटोला ४५ अंश कोनात झुकवून पाहिलं, तर मांजर लगेचच दिसते.
-
फोटो पुन्हा एकदा पाहा. लपलेली मांजर सापडते का पाहा… आणि उत्तर मिळालं तर कमेंटमध्ये नक्की सांगा– किती वेळ लागला? पुढला फोटो पाहा तुम्हाला मांजर कुठे लपलेली आहे, ते दिसेल…
-
मग सापडली ना मांजर…हे एक ऑप्टिकल इल्युजन आहे, म्हणजेच मेंदूला मिळणारा खुराक. मानसशास्त्रज्ञ सांगतात की, अशा प्रकारच्या चित्रांमुळे आपला मेंदू ‘पॅटर्न रिकग्निशन’ पद्धतीने काम करीत असतो. ज्या लोकांची निरीक्षणशक्ती अधिक तीव्र असते, त्यांना अशा लपलेल्या गोष्टी पटकन सापडतात. (फोटो सौजन्य : एक्स व्हिडीओ स्क्रीनशॉट)

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”