-
दुर्लक्ष करू नका
प्रत्येकजण पहिल्या जॉबच्या आनंदात राहतो. पण दुसऱ्या बाजूला नवीन ऑफिस, नवी लोकं, नवं वातावरण अन् मनात अनेक प्रश्नही राहतात. (Photo: AI) -
तसेच या सगळ्याला सामोरे जाताना आणखी एक महत्वाचे काम करायचे असते. त्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. (File Photo)
-
पीएफ खातं
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएओकडून पहिल्या नोकरीचे खाते उघडले जाते. यावेळी एक युनिव्हर्सल अकाऊंट क्रमांक देखील दिला जातो. हा क्रमांक तुमच्या कामाच्या संपूर्ण कारकीर्दीमध्ये तुमचं पीएफ खातं व्यवस्थापित करण्यासाठी महत्वाचं असतं. (File Photo) -
युएएन सक्रिय करणे
प्रत्येक कर्मचाऱ्याने त्याचा युएन सक्रिय करणे अत्यंत महत्वाचे आहे. त्याशिवाय पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम तपासणे शक्य नसते. त्याशिवाय ऑनलाइन क्लेम किंवा ट्रान्सफरही करता येत नाही. (File Photo) -
पैसे सुरक्षित राहतात
भविष्यात तुम्ही नोकरी बदलली तरी तुमचं नवीन पीएफ खातं आपोआप युएएनशी लिंक होतं. यामुळे विविध खात्यांचं टेन्शन संपतं व तुमचे पैसेही सुरक्षित राहतात. (File Photo) -
कर्मचाऱ्याची जबाबदारी
कोणतीही कंपनी स्वत: कर्मचाऱ्यांचे युएन तात्काळ बनवून घेतात पण ते सक्रिय करण्याची जबाबदारी ही कर्मचाऱ्यांची आहे. (File Photo) -
पासवर्ड
युएएन सक्रिय करण्यासाठी, ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागते. तिथं आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी पडताळणी केल्यानंतर पासवर्ड सेट करता येतो. (File Photo) -
शिल्लक तपासणे
सक्रिय केल्यानंतर तुम्ही मोबाईल अॅप किंवा ऑनलाईन पोर्टलवरून शिल्लक, मागील नोकऱ्यांचा तपशील व पैसे काढण्याची स्थिती तपासण्यास पात्र व्हाल. (File Photo) -
महत्वाचे
जर तुम्ही युएएन सक्रिय केले नाही तर तुम्हाला पीएफ खात्याचे कोणतेच काम करता येणार नाही. म्हणून पहिल्या नोकरीवेळी ही गोष्ट करण्याला प्राधान्य देणे महत्वाचे आहे. (File Photo) हेही पाहा- क्रिस्तियानो रोनाल्डो ते इंटरनेटवर चर्चेत आलेल्या पाच सेलिब्रिटींच्या हटके लग्नाच्या अंगठ्या, फोटो पाहा

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”