-
तुम्ही भारतात रेल्वने प्रवास करणारी प्रचंड गर्दी पाहिलीच असेल, पण युरोपमध्ये एक देश आहे जिथे फक्त एकच रेल्वे स्टेशन आहे. हा देश म्हणजे मोनाको, या देशाला श्रीमंत नागरिकांची राजधानी असही म्हटले जाते. (Photo: Pictures Of Monaco/Facebook)
-
तुम्ही भारतात रेल्वने प्रवास करणारी प्रचंड गर्दी पाहिलीच असेल, पण युरोपमध्ये एक देश आहे जिथे फक्त एकच रेल्वे स्टेशन आहे. हा देश म्हणजे मोनाको, या देशाला श्रीमंत नागरिकांची राजधानी असही म्हटले जाते. (Photo: Pictures Of Monaco/Facebook)
-
फ्रान्सजवळील मोनाको हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लहान देश आहे. या देशाचे एकूण क्षेत्रफळ फक्त १.९५ चौरस किलोमीटर आहे आणि लोकसंख्या फक्त ४० हजार एवढीच आहे. (Photo: Pictures Of Monaco/Facebook)
-
दररोज २० ते ३० गाड्या या स्थानकावरून प्रवाशांना घेऊन जातात. हे रेल्वे स्टेशन जमिनीपासून सुमारे ४३ फूट खाली बोगद्यात आहे या स्थानकाची लांबी सुमारे १,५२९ फूट आणि रुंदी ७२ फूट आहे. (Photo: Pictures Of Monaco/Facebook)
-
कमी लोकसंख्येमुळे, संपूर्ण देशाला फक्त एकाच स्टेशनद्वारे सेवा दिली जाणे शक्य आहे. भारतातील रेल्वे स्थानकांवर आढळणाऱ्या गर्दीसारखी गर्दी इथे पाहायला मिळत नाही. (Photo: Pictures Of Monaco/Facebook)
-
मोनाकोची आणखी एक खासियत म्हणजे येथील प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीची एकूण संपत्ती १० लाख डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजेच ८ कोटी रुपये इतकी आहे. (Photo: Pictures Of Monaco/Facebook)
-
म्हणूनच मोनाकोला ‘श्रीमंतांची राजधानी’ म्हटले जाते. या देशाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटनावर आधारित आहे. (Photo: Pictures Of Monaco/Facebook)
-
सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे कोट्यधिशांच्या या देशात लोकांना आयकरही भरावा लागत नाही. कदाचित हेच कारण असेल की एक छोटेसे स्टेशन या देशातल्या प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खूप आहे. (Photo: Pictures Of Monaco/Facebook)
-
येथून बसलेले प्रवासी फ्रान्स रिव्हिएरामधील नाइस सिटी, कान्स सिटी, इटलीतील व्हेंटिमिग्लिया अशा शहरांमध्ये उतरतात. (Photo: Pictures Of Monaco/Facebook) हेही पाहा- विकास दिव्यकीर्ती ते खान सर; देशातले ‘हे’ ७ शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये एवढे लोकप्रिय का आहेत?

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी