-
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ३ सप्टेंबर रोजी जीएसटीमध्ये मोठे बदल जाहीर केले. जीएसटीमधील १२ आणि २८ टक्क्यांचा स्लॅब संपविण्यात आला असून आता सर्व वस्तू या ५ टक्के आणि १८ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आणण्यात आल्या आहेत.
-
त्यामुळे देशात आता फक्त ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच जीएसटी स्लॅब असतील. आता नवीन जीएसटी दर २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होतील.
-
सरकारच्या नव्या पावलामुळे येत्या काही दिवसांत काही महागड्या वस्तूंच्या किमतीत मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
जर तुम्ही सध्या महागड्या वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर थोडं थांबणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं, कारण २२ सप्टेंबरनंतर परिस्थितीत मोठा बदल होणार असल्याची चर्चा आहे. चला तर जाणून घेऊयात कोणत्या वस्तू स्वस्त होऊ शकतात.
-
कार खरेदीत घाई करू नका: नव्या जीएसटी कपातीनंतर कारच्या किमतींमध्ये मोठा फरक पडू शकतो, अशी शक्यता आहे; त्यामुळे ज्यांनी नवी कार घेण्याचं ठरवलं आहे, त्यांनी काही दिवस संयम ठेवला तर त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो.
-
बाईकप्रेमींसाठीही आनंदाची बातमी: फक्त कारच नव्हे, तर बाईक्स खरेदी करणार्यांनाही या बदलाचा फायदा होऊ शकतो. सध्या ज्यांना नवी बाईक घेण्याची घाई आहे, त्यांनी काही दिवस थांबलं तर खिशावरचा भार हलका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-
घरगुती वस्तूंवरही परिणाम: फक्त वाहनच नव्हे, तर एसी, टीव्ही यांसारख्या घरगुती इलेक्ट्रॉनिक्सवरही या निर्णयाचा प्रभाव पडू शकतो. एसी घेण्याचा विचार करणाऱ्यांनी किंवा नवीन टीव्ही खरेदी करायची योजना आखणाऱ्यांनीही थोडं थांबणं योग्य ठरेल. कारण २२ सप्टेंबरनंतरचं चित्र ग्राहकांसाठी खूपच आशादायी ठरू शकतं.
-
लक्झरी वाहनांवर मोठा बदल: महागड्या एसयूव्ही किंवा लक्झरी कार्स खरेदी करणार्यांसाठीही ही बातमी महत्त्वाची आहे. कारण सरकारच्या निर्णयामुळे अशा वाहनांच्या किमतीत मोठा फरक पडण्याची दाट शक्यता आहे.
-
सरकारने अलीकडेच जीएसटी दरात कपात करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वसामान्य, गरीब नागरिकांच्या जीवनाश्यक अशा वस्तूंवरील कर आता कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, हे बदल २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत, त्यामुळे या तारखेपूर्वी मोठ्या वस्तू खरेदी केल्यास ग्राहकांना नंतर पश्चाताप होऊ शकतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम\ फायनान्शियल एक्सप्रेस )

आठवड्याच्या सुरुवातीला कोणत्या राशींच्या कानी पडणार शुभवार्ता? वाचा मेष ते मीनचे सोमवार विशेष राशिभविष्य