-
भारतातल्या प्रत्येक गल्लीत मिळणारा एक स्नॅक… ज्याच्या नावाशिवाय स्ट्रीट फूड अपूर्णच वाटतं.
-
पोटाला भूक लागली की, पहिल्यांदा आठवणारा पदार्थ म्हणजे चटपटीत चवींचा राजा ‘पाणीपुरी’.
-
छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता असलेला हा पदार्थ काही मिनिटांत भूक भागवतो.
-
गाडीवाला ओरडला की, लगेच लोकांची गर्दी त्याच्याभोवती जमते.
-
कुणी याला गोलगप्पा म्हणतो, कुणी पुचका, तर कुणी गुपचूप, कुणी पाणीपुरी.
-
प्रत्येक राज्यात याला वेगवेगळी नावं… पण याची चव मात्र सगळीकडेच जबरदस्त.
-
मसालेदार पाणी, बटाट्याचा कीस, चटणी आणि कुरकुरीत पुरी… अहाहा!
-
एकदा खायला सुरुवात केली की, एकावर थांबणं अशक्यच.
-
हलका नाश्ता, मैफील, गप्पागोष्टी अशा वेळी हा स्नॅक नेहमी हिट.
-
आता याची लोकप्रियता फक्त भारतातच नाही… परदेशांतही झपाट्याने वाढतेय.
-
पण प्रश्न असा की… हे जबरदस्त स्ट्रीट फूड असलेल्या पाणीपुरीला इंग्रजीत काय म्हणतात माहितीये का?
-
त्याचे उत्तर वॉटर बॉल्स (Water Balls), असे देता येईल. (फोटो सौजन्य:Pixabay\AI Generated)

Asia Cup Final: भारत-पाकिस्तान फायनलसाठी कसं आहे समीकरण? पाक संघाला अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी काय करावं लागणार? वाचा सविस्तर