-
जर पृथ्वीने अचानक तिच्या अक्षावर फिरायचं थांबवलं तर काय होईल याची कल्पना करा? हा प्रश्न कदाचित कधीतरी प्रत्येकाच्या मनात आलाच असेल. अलीकडेच, प्रसिद्ध अमेरिकन खगोलभौतिकशास्त्रज्ञ नील डीग्रास टायसन यांनी या प्रश्नावर भाष्य केलं आहे आणि असं होणं मानवी जीवनासाठी विनाशकारी असल्याचं त्यांनी म्हटलंय. (Photo: Unsplash)
-
टायसन यांच्या मते, “पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट त्याच्या परिभ्रमणामुळे पूर्वेकडे सरकत आहे. जर पृथ्वीने अचानक फिरणे बंद केले, तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील प्रत्येकजण पृथ्वीच्या परिभ्रमणाच्या बरोबरीत राहू शकणार नाही.” (Photo: Unsplash)
-
व्हिडिओमध्ये, टायसन स्पष्ट करतात की, न्यू यॉर्कसारख्या शहराची अक्षांश स्थिती पाहता, पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे तेथील रहिवासी आधीच पूर्वेकडे अंदाजे ८०० मैल प्रति तास वेगाने सरकत आहेत. जर हे परिभ्रमण अचानक थांबले तर संपूर्ण मानवी संस्कृती एका क्षणात नष्ट होऊ शकते. (Photo: Unsplash)
-
ते पुढे म्हणाले, “पृथ्वी अचानक थांबल्यास लोक पृथ्वीच्या पृष्ठभागावरून इतक्या वेगाने फेकले जातील की त्यामुळे लोक घरातल्या खिडक्यांमधून बाहेर फेकले जातील आणि त्यामुळे जीवित आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होईल.” (Photo: Unsplash)
-
टायसन यांच्या मते, जर पृथ्वी एका सेकंदासाठीही थांबली तर इमारती, भिंती आणि जमिनीवर आदळून लोक तात्काळ मृत्युमुखी पडतील. वाहने, झाडे, समुद्राच्या लाटा – सर्वकाही नियंत्रणाबाहेर जाईल आणि पृथ्वीवर विनाश घडेल. (Photo: Unsplash)
-
टायसन म्हणतात की जर असे झाले तर पृथ्वीवरील सर्व लोक आणि प्राण्यांना गंभीर दुखापत किंवा थेट मृत्यू होऊ शकतो. तो फक्त एक वाईट दिवस नसेल तर संपूर्ण मानवी जीवनासाठी धोक्याचा असेल. (Photo: Unsplash)
-
पृथ्वीची हालचाल आणि तिचे महत्त्व
पृथ्वी दर २४ तासांनी तिच्या अक्षाभोवती एकदा फिरते, ज्यामुळे दिवस आणि रात्र निर्माण होते. जर ती अचानक थांबली तर लोक केवळ दिशाहीन होतील असे नाही तर हवामानात देखील पूर्णपणे बदल होईल. (Photo: Unsplash) -
समुद्राचे पाणीही दिशा बदलेल आणि मोकळी जमीन पाण्याखाली जाईल. वातावरणातील हालचालींमुळे तीव्र वादळे निर्माण होतील. सूर्य आणि चंद्राच्या स्थितीचे वेगवेगळे परिणाम होतील. (Photo: Unsplash)
-
पृथ्वीचा एक भाग सतत सूर्याच्या दिशेने राहीला तर तो अत्यंत उष्ण राहील, तर दुसरा भाग कायमचा अंधारात राहील, जिथलं तापमान कमी होईल. पृथ्वीच्या अचानक थांबण्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरही ताण निर्माण होईल, ज्यामुळे भूकंपही होतील. (Photo: Unsplash)
-
नील डीग्रास टायसन कोण आहेत?
नील डीग्रास टायसन हे एक प्रसिद्ध अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञान संवादक आहेत. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठ, टेक्सास विद्यापीठ आणि कोलंबिया विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. -
ते न्यू यॉर्कमधील हेडन प्लॅनेटेरियमचे संचालक आहेत आणि विज्ञानाचा सोप्या, सुलभ भाषेत प्रचार करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी कॉसमॉस: अ स्पेसटाइम ओडिसी (Cosmos: A Spacetime Odyssey) आणि स्टारटॉक (StarTalk) सारख्या टेलिव्हिजन शोद्वारे विज्ञान लोकप्रिय केले आहे. (Photo: Unsplash)
हेही पाहा- रागासा चक्रिवादळाचा कहर! तैवानमध्ये १४ मृत्यू, अनेक बेपत्ता; शाळा-कार्यालयं बंद, भारताकडे येणारी विमानं रद्द

अखेर अमेरिकेची खरी अडचण समोर आली! ऊर्जामंत्री म्हणाले, “भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्यापेक्षा…”