-
जगातील प्रत्येक संस्कृती मृत्यूकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहते. मृत प्रियजनांच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी विविध परंपरा आणि सण साजरे केले जातात. येथे अशाच सहा महत्त्वाच्या परंपरांचा परिचय
-
सर्व संत दिन – फिलिपिन्स आणि युरोप
या दिवशी कुटुंबीय स्मशानभूमींना भेट देतात, मेणबत्त्या पेटवतात आणि मृत संत, तसेच प्रियजनांच्या स्मृतीसाठी जागरण करतात. हा दिवस भक्तिभावाने आणि शांततेत साजरा केला जातो. -
दिया दे लॉस मुएर्टोस – मेक्सिको
‘डेडचा दिवस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रंगीत उत्सवात वेदी (ऑफ्रेंडा), झेंडूच्या फुलांचा हार, साखरेच्या कवट्या आणि आवडत्या पदार्थांच्या प्रसादाने मृतांचे स्मरण केले जाते. मृत आणि जिवंत यांच्यातील नात्याचा अनोखा सण. -
फमादिहाना – मादागास्कर
‘हाडांचे वळण’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या परंपरेत कुटुंबीय पूर्वजांचे मृतदेह बाहेर काढतात. त्यांना नव्या कापडात गुंडाळतात आणि संगीत व नृत्याच्या जल्लोषात या परंपरेचा उत्सव साजरा करतात. -
गाय जत्रा – नेपाळ
हा उत्सव शोक आणि आनंदाचा संगम आहे. गेल्या वर्षभरात निधन झालेल्यांच्या स्मृतीसाठी कुटुंबीय संचलन करतात. विनोदी पोशाख, हलक्याफुलक्या चेष्टा आणि रंगीबेरंगी वातावरण यांमुळे या उत्सवी जत्रेला वेगळेपण मिळते. -
ओबोन – जपान
बौद्ध परंपरेवर आधारित हा उत्सव पूर्वजांच्या आत्म्यांचे स्वागत करण्यासाठी साजरा होतो. कुटुंबीय कबरींना भेट देतात, कंदील पेटवतात आणि पारंपरिक नृत्य ‘बोन ओडोरी’च्या माध्यमातून पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करतात. -
पितृ पक्ष – भारत
हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा. यामध्ये पूर्वजांच्या स्मरणार्थ ‘पिंडदान’ यांसारखे विधी केले जातात. त्यामागे पूर्वजांचे आशीर्वाद लाभावेत आणि घरासह कुटुंबामध्ये समृद्धी, शांती नांदावी ही भावना असते.

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ