-
ज्योतिषशास्त्रानुसार, बुध हा बुद्धी, संवाद, व्यापार आणि तर्कशक्तीचा कारक ग्रह मानला जातो.
-
बुध ग्रहाने तूळ राशीत प्रवेश केला आणि त्यानंतर आकाशातील ग्रहस्थितीत मोठी उलथापालथ घडली आहे.
-
आता बुध २४ ऑक्टोबरपर्यंत तूळ राशीत भ्रमण करणार असून, त्या काळात काही राशींच्या लोकांचं नशीब अक्षरशः पालटणार आहे.
-
त्यानुसार काही राशींच्या लोकांना अफाट यश, पैसा व प्रतिष्ठा देऊन जाणार आहे. काहींना अचानक आलेल्या संधी थक्क करून सोडणार आहेत. चला तर पाहूयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
-
बुधाचा राशिबदल मकर राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ परिणाम घेऊन आला आहे. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ आता तुम्हाला मिळू शकतो. तुमच्या आर्थिक स्थितीत अचानक सुधारणा होऊ शकते, मोठ्या करारांवर शिक्कामोर्तब होईल.
-
हा काळ कर्क राशीच्या लोकांसाठीही समाधान देणारा ठरेल. बराच काळ चालू असलेल्या अडचणींना आता पूर्णविराम लागू शकतो. मित्रांच्या मदतीनं तुम्ही आपलं ध्येय गाठू शकता. जमीन-जुमल्याचे व्यवहार फायदेशीर ठरतील, घर विक्री किंवा खरेदीसाठी योग्य वेळ आहे.
-
बुधाचे राशी परिवर्तन वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. आर्थिक अडचणींवर मात करू शकाल, बँक कर्जासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. कर्जमुक्त होण्याचा मार्ग खुला होईल.
-
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)
-

Rakesh Kishore Reaction: CJI B. R. Gavai यांच्यावर बूट फेकणारे वकील राकेश किशोर यांची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाले, “दैवी शक्तीमुळे हे कृत्य केले”