-  
  Diwali 2025: भारतीय संस्कृतीमध्ये असलेले गायीचे महत्त्व अधोरेखित करणारा वसुबारस (Vasu Baras 2025) हा दिवाळी सणाचा पहिला दिवस. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
 -  
  वसुबारसला ‘गोवत्स द्वादशी’ (Govatsa Dwadashi) म्हणूनही ओळखले जाते.
 -  
  गाय आणि वासरु यांची पूजा करण्याचा दिवस म्हणजे वसुबारस. या दिवशी दुधदुभत्या जनावरांची, बैलांची बळीराजा पूजा करतो.
 -  
  या दिवशी गावाकडे गोठे स्वच्छ करून सजवले जातात. कुंकू, फुले वाहून गाय वासराची पूजा केली जाते. त्यांना गोड नैवैद्य खायला दिला जातो.
 -  
  सुगंधी फुलांचा हार घालून गायीला अर्घ्य दिले दाते. तांब्याच्या कलशातले ताज्या पाण्याचे अर्घ्य वासराच्याच्या पायांवर सोडले जाते.
 -  
  या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ वस्त्र परिधान करून घराबाहेर रांगोळी काढावी.
 -  
  जर तुम्ही शहरी भागात राहत असाल, तर गाय व वासराचीच्या मूर्ती किंवा फोटोची पूजा करू शकता.
 -  
  यंदा १७ ऑक्टोबर रोजी वसुबारस साजरी केली जाणार आहे. भारतीय संस्कृतीत पशूधनाची पूजा करण्याची परंपरा आहे.
 
  Naxal Leader Bhupathi Surrender : नक्षल चळवळीला सर्वोच्च धक्का! ; वरिष्ठ नेता भूपतीची ६० सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर शरणागती…